अहमदनगर प्रतिनिधी| सोयाबीन पिकाला वेळेवर पाणी मिळाले नसल्यामुळे सोयबीनच्या झाडाला शेंगाच आल्या नाही त्यामुळे दीड एक्कर सोयाबीन पिकात रोटाव्हॅटर घालून नांगरून टाकले शिर्डी जवळच्या केलवड गावातील शेतकरी नानासाहेब धोंडिबा फटांगरे यांनी आपल्या दिड एकर सोयाबीन पिकात रोटाव्हॅटर घातला.
पावसाचे दिवस संपत आले तरी देखील शेती लायक पाऊस झाला नाही.त्या मुळे उभ्यापिकात नांगर घालण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. शेती लायक पाऊस न झाल्याने केलवड गावातील अनेक शेतकरी मेटाकुटीस आला आहे. फटांगरे यांच्या सोयाबीन पिकाला एकही शेंग आली नाही त्यामुळे या पिकात नांगर घातल्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता.संबंधित तलाठी व कृषी अधिकारी यांना फोनवरून माहिती कळविली परंतु त्याच्या कडून समाधान कारक उत्तर न मिळाल्यामुळे फटांगरे या शेतकऱ्याने पोटच्या मुलासारखं जपलेल्या सोयाबीन पिकात रोटाव्हॅटर घालून नांगरून टाकले.
केलवड हे गाव निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील गाव आहे परंतु ४८ वर्षांपासून फक्त हे शेतकरी पाण्याची वाट पाहतात त्यांना अजूनही पाणी मिळाले नाही धरण उशाला कोरड घशाला अशी परिसस्थिती केलवड गावातील शेतकऱ्यांची आहे.