हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी एअर इंडियाने मोठी घोषणा केली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी एअर इंडियाने तिकिटाच्या दरात 50 टक्के सूट करण्याचे जाहीर केले आहे. ही सूट देशातील सर्व मार्गांवर असणार आहे. ही सवलत ज्या वर्गाला देण्यात येत आहे त्यांनी किमान 3 दिवस आधी तिकिट बुकिंग करणं आवश्यक आहे.
मंत्रालयाच्या माहितीनुसार जेव्हा सीनिअर सिटिझन एअर इंडियाच्या फ्लाइटने प्रवास करतील तेव्हा त्यांच्याकडे काही दस्तावेज असणं आवश्यक आहे. त्यांच्याकडे ओळखपत्र असणं गरजेचं आहे, ज्यावर जन्मतारखेचा उल्लेख असणं आवश्यक आहे. शिवाय नागरी उड्डाण मंत्रालयाने असं म्हटलं आहे की जर या प्रवाशांकडे ओळखपत्र नसेल तर त्यांना ही सूट दिली जाणार नाही. अशावेळी ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण भाडं द्यावं लागेल.
एअर इंडियाच्या माहितीनुसार 60 वर्षाहून अधिक वयाच्या प्रवाशांना देशांतर्गत उड्डाणांवर सूट देण्यात आली आहे. त्याचबरोबर या सवलतीचा फायदा फक्त इकॉनॉमी केबिनच्या बुकिंगवरच देण्यात येईल. ज्येष्ठ नागरिकांनी तिकिट बुक केल्यास त्यांना बेसिक फेअरचे 50 टक्के पैसे द्यावे लागतील. ही ऑफर तिकीट जारी करण्याच्या तारखेपासून एक वर्षासाठी लागू असेल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’