मुंबई । एअरटेल आणि आयडिया- व्होडाफोन कंपन्यांनी या महिन्यात ज्या प्लानची वैधता संपणार होती. ती आता ३ मे पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे या गोरगरीब युजर्संना मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. लॉकडाऊनचा सर्वात जास्त फटका गोरगरीब जनतेवर होत असून अनेक मजूर महानगरांमध्ये अडकून पडले आहेत. अशातच आपल्या घरच्यांशी संपर्क करण्याचे एकमेव साधन म्हणजे मोबाईल फोन. मात्र, छोटे मोबाईलला रिचार्ज करण्यारी दुकान बंद असल्यानं तसेच जवळ पैसे नसल्यानं त्यांची मोठी अडचण होत होती. दरम्यान, अशा गोरगरीब मोबाईल धारक प्री-पेड युजर्संना दिलासा देण्यासाठी एअरटेल, आयडिया-व्होडाफोनने या टेलिकॉम कंपन्या पुढे आल्या आहेत.
पृथ्वीवर आणखीन एक मोठे संकट, ओझोन थराला पडलेय मोठे छिद्र#HelloMaharashtrahttps://t.co/yT96JZZylX
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 10, 2020
पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या मोबाइल युजर्संना १७ एप्रिल पर्यंत वैधता वाढवली होती. ही वैधता वाढवण्यात आल्याने प्री पेड ग्राहकांची वैधता संपणार होती. त्या युजर्संना मोठा दिलासा मिळाला होता. देशभरात सध्या ३ मे पर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. त्यामुळे युजर्संना अडचणीचा सामना करावा लागू नये, म्हणून येत्या ३ मे पर्यंत युजर्संची इनकमिंग सुरू राहणार आहे. एकीकडे या कंपन्यांनी वैधता वाढवली असली तरी जिओने मात्र अद्याप वैधता वाढवण्याची कोणतीही घोषणा केली नाही. सर्वात आधी टेलिकॉम कंपन्यांनी एटीएम आणि मिस्डकॉलवरून मोबाइल रिचार्ज करण्याची सुविधा दिली होती. तसेच दुसऱ्यांचे रिचार्ज करणाऱ्या युजर्संना कंपन्यांनी ४-६ टक्के कमिशन देण्यास सुरुवात केली आहे.
कोरोनासोबत आता 'सारी';चाही धोका वाढतोय; अहमदनगर मध्ये सापडले ४२ रुग्ण#HelloMaharashtra #Covid_19 https://t.co/FAnGYkuYx3
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 17, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”
इतर महत्वाच्या बातम्या –
या देशांमध्ये अद्याप एकही कोरोनाग्रस्त नाही, घ्या जाणुन
आता ८ एवजी १२ तासांची होणार कामाची शिफ्ट? कायद्यात होणार सुधारणा
मासे किंवा अन्य सीफूड खात असाल तर सावधान! UN ची चेतावणी
भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना दिलासा, सीएम ठाकरेंनी घेतला ‘हा’ खास निर्णय
सरकार हॅलिकोप्टरमधून टाकणार लोकांसाठी पैसे? जाणुन घ्या सत्य
ब्रेकिंग बातम्यांसाठी पहा -www.hellomaharashtra.in