अजिंठा-वेरूळ पर्यटनाला करोनाचा फटका; ७ एप्रिलपर्यंत लेण्या बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी । देशात करोनाच्या वाढत्या प्रभावामुळे औरंगाबादमधील जगविख्यात अजिंठा आणि वेरुळ लेण्या बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. येत्या 19 मार्चपासून 7 एप्रिलपर्यंत वेरुळ आणि अजिंठा लेणी बंद राहणार आहेत. करोनाच्या प्रभावामुळे फक्त अजिंठा आणि वेरूळ लेण्यासोबतच ताजमहलची प्रतिकृती असलेला बीबी-का-मकबारा, औरंगाबाद लेणी, दौलताबाद (देवगिरी) किल्ला, पानचक्की इत्यादी पर्यटन स्थळेही प्रशासनाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुरातत्व खात्याच्या अंतर्गत येणारी सर्व पर्यटन स्थळे 19 मार्चपासून 7 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत. पुढील दोन दिवसात या स्थळांवर येणाऱ्या परदेशी नागरिकांची याआधीच स्क्रीनींग झालेली असल्यामुळे त्यांना येत्या दोन दिवसात ही पर्यटन स्थळे पाहता येणार आहेत.

शहरात कोरोना पॉजिटिव्ह महिला आढळल्यानंतर आणखी एका महिलेला संशयित म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संबंधित महिला ‘त्या’ खाजगी रुग्णालयात करोना पॉजिटीव्ह आलेल्या रुग्णाची मैत्रीण असल्याची माहिती समोर आली आहे. दोघीही एकाच महाविद्यालयातल्या आहेत. विशेष म्हणजे या महाविद्यालयातील हॉस्टेलमधील विद्यार्थींना क्वारेंटाइन करण्यात आले आहे. तसेच, त्यांना घरी न जाण्यासही सांगण्यात आले आहे. पॉजिटिव्ह असलेली महिला ज्या भागात राहते, त्या ठिकाणची आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात येत आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.