जर कुणाला काही वाटत असेल तर तक्रार करावी…, मुंबै बँक घोटाळा चौकशीवरून अजितदादांचा दरेकरांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य सहकार विभागाने मुंबै बँक कथित गैरव्यवहार प्रकरणी सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ३ महिन्यांत यासंदर्भातला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असून जिल्हा उपनिबंधक प्रताप पाटील यांची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर प्रवीण दरेकर यांनी संतापून ‘आता माझा एककलमी कार्यक्रम हा घोटाळे बाहेर काढण्याचा असणार आहे’, असं म्हटलं. दरेकरांच्या या इशाऱ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोखठोक प्रत्युत्तर दिलं.

प्रत्येक संस्थेबद्दल कुणाचं काही मत असेल तर केंद्र सरकार, राज्य सरकार त्यांच्या वेगवेगळ्या विभागामार्फत चौकशी करु शकते. कुणाला काही वाटत असेल, काही माहिती असेल तर तर त्यांनी संबंधितांकडे तक्रार करावी. तक्रारीची चौकशी केली जाईल. तक्रारीत तथ्य असेल तर संबंधितांवर अॅक्शन घेण्यात येईल, जर तथ्य नसेल तर तक्रारीत तथ्य नाही, असं सांगण्यात येईल.

दरेकर नेमकं काय म्हणाले होते-

दरम्यान, याआधी प्रविण दरेकर यांनी आपल्यावरील चौकशीच्या आदेशांवर टीका करतानाच राज्यातील सहकार विभागातील घोटाळे बाहेर काढण्याचा एककलमी कार्यक्रम राबवणार असल्यचा इशारा दिला आहे. “तुम्ही बरबटलेल्या हातांनी चौकशी काय करणार? पुणे जिल्हा बँकेत महाभ्रष्टाचार आहे. त्याची तक्रार ईडी, सीबीआय आणि केेंद्र सरकारकडे करणार असल्याचं विधान दरेकरांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना केलं. तसंच राज्यातील राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या बँकांच्या देशील तक्रारी केंद्र सरकारकडे करणार असल्याचं दरेकर म्हणाले होते.

You might also like