हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बहुप्रतीक्षीत पुणे मेट्रो आज अखेर ट्रायल रनच्या निमित्ताने धावली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला.वनाझ ते आयडियल कॉलनी मार्गावर पुणे मेट्रोची पहिली ट्रायल रन आज पार पडली. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश मिश्रा उपस्थित होते.
वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गिकेच्या अंतर्गत वनाज ते आयडियल कॉलनी या टप्प्यात पुणे मेट्रोची ट्रायल रन घेण्यात आली. तीन डब्यांच्या दोन मेट्रो रेल्वेद्वारे साडेतीन किलोमीटर अंतरात ही चाचणी झाली. मेट्रोकडून याच मार्गावर काही दिवसांपूर्वी सरावपूर्व चाचणी घेण्यात आली होती. चाचणीनंतर ऑक्टोबर अखेपर्यंत मेट्रोची प्रवासी सेवा सुरु करण्याची महामेट्रोचा विचार आहे
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असे सांगितले की, पुणे मेट्रोचे काम प्रगतीपथावर असून निवडणुका झाल्यावर राजकीय विचार बाजूला ठेवून विकास कामाला महत्त्व द्यायचं असतं, हे लक्षात घेऊन आम्ही काम करत आहोत. त्यातूनच पुणे मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. शरद पवार कायम सांगत आलेत, कोणत्याही गोष्टीचा विचार करताना कमीतकमी 25 तर जास्तीतजास्त 50 वर्षाचा विचार करुन करत जा. पुढची 50 वर्ष डोळे समोर निर्णय घेतोय. ही सगळी काम करताना राजकारण न करता करण्याचा आमचा मानस आहे, असंही अजित पवार म्हणाले.