हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केल्यानंतर त्यांच्या टीकेवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पलटवार केला आहे. “जरी आमचं नाकाखालनं सरकार काढलं असलं तरी आम्ही तिथे नाक खूपसायला जात नाही. प्रत्येकाची नाकं तपासावी लागतील. त्याच्या खोलामध्ये मला जायचं नाही,” असे प्रत्युत्तर अजित पवार यांनी फडणवीसांना दिले.
नागपूर येथे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, फडणवीसांनी टीका करताना नाकाचा उल्लेख करावा हे अगदी दुर्दैवं आहे. आता आम्हालाही प्रत्येकाची नाकं तपासावी लागतील. एकेकाळी हेच लोक म्हणायचे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय अंतर्गत आहे.
आमचा काहीच संबंध नाही त्यानंतर तेच म्हणाले, आम्ही बदला घेतला. ज्या दिवसापासून महाविकास आघाडीचं सरकार आलं. त्या दिवसापासून त्यांना वेदना होत होत्या. त्यामुळे ते कामाला लागले होते. हे आता जगजाहीर झालं आहे. त्यांनी आता नाकाखालून घेतलं की कुठून घेतलं हा संशोधनाचा भाग आहे
2024 मध्ये काय होईल हे सांगायला आम्ही ज्योतिषी नाही
काल आम्ही महाराष्ट्र द्रोह्यांविरोधात महामोर्चा काढला. एकजूट टिकवणं हा आम्हा सर्वांचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्ही आणि आमचे सर्व वरिष्ठ प्रयत्न करत आहोत. परंतु २०२४ मध्ये काय होईल?, हे सांगायला आम्ही ज्योतिषी नाही. तसेच आम्ही ज्योषिताकडं जाऊन पाहणी सुद्धा करत नाही, असे पवारांनी म्हंटले.