हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी
अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपती निवड करण्यात आली. यानंतर पवार यांनी सर्वांचे आभार मानत आपली भूमिका स्पष्ट केली. “2004 पासून एकनाथ शिंदेंना आमदार म्हणून पाहिलं आहे. पण 2004 ते 2022 पर्यंत असं भाषण मी कधीच ऐकलं नव्हतं. आता ऐकले शिंदे साहेबांची गाडी सुसाट सुटली. पण माणसाला कुठेतरी मन मोकळ करावे वाटत. त्यांनी त्यांचे काम करावे आपण आपले काम करावं, अशा पद्धतीने लोकशाही जपवण्याचं काम व्हावे जर जनतेने ठरवले तर अनेक बलाढय नेत्यांना सत्तेतून बाहेर बसवतात, असे सूचक विधान यावेळी पवारांनी केले.
विरोधीपक्षनेते पदी निवड झाल्यानंतर अजित पवार यांनी सभागृहास संबोधित केले. ते म्हणाले की, मी अनेक वर्ष सत्ताधारी पक्षातून काम केलं आहे. 1990 मध्ये मी, जयंत पाटील, आर आर पाटील आलो. अनेक नेत्यांनी विरोधी पक्षनेतेपदाची ताकद काय असते दाखवून दिलं आहे. लोकशाहीत विधीमंडळात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अध्यक्ष या पदाप्रमाणे विरोधी पक्षनेतेपदही महत्वाचे असते. महाराष्ट्रात कधी कुठे काय घडेल सांगता येत नाही. ठाण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातही बिकट स्थिती आहे.
कोणत्याही स्तरावरील लोकांसोबत काम करताना आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी अपेक्षा असते. सत्ताधाऱ्यांकडून न्याय मिळाला नाही तर ते विरोधी पक्षाकडे जातात. विरोधाला विरोध करणारे आम्ही नाही. सध्या लोकप्रिय निर्णय घेण्याकडे सगळ्यांचा कल आहे. पंजाब सरकारचं आपल्यासमोर उदाहरण आहे. फुकट मिळालं की चांगलं वाटतं, पण निधीत पैसा कमी पडेल याकडे लक्ष दिलं पाहिजे असा सल्ला पवारांनी यावेळी सत्ताधाऱ्यांना दिला.
आषाढी एकदशीची पूजा आता एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार : अजित पवार
यावेळी संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या आषाढी एकादशीची पूजा कोणाच्या हस्ते होणार? याचे उत्तर अजित पवारांनी यावेळी दिले. ते म्हणाले की, आषाढी एकदशीची पूजा उद्धव ठाकरे करणार की देवेंद्र फडणवीस अशी चर्चा होती. पण आता एकनाथ शिंदेंच्या हस्ते पूजा होणार आहे. दोन वर्ष पालखी निघाली नसल्याने वारकरी पण नाराज होते. आता तुम्हाला मान मिळाला आहे त्याबद्दलही अभिनंदन असे पवारांनी सांगितले.