“उपमुख्यमंत्री होण्यास अजित पवार नेहमी तयार..”, कोश्यारींचे मिश्किल वक्तव्य चर्चेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीतून बंड करत अजित पवार भाजपमध्ये जाताच त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आता अजित पवार भाजपसोबत सत्तेत राहून राज्याचा कारभार चालवताना दिसत आहेत. यादरम्यानच भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून अजित पवारांच्या कामाची दखल घेण्यात आली आहे. तसेच, अजित पवार यांना किती ही वेळा उपमुख्यमंत्री होण्यास सांगा, ते तयार असतात असं मिश्किल भाष्य देखील भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे.

नुकतीच भगतसिंह कोश्यारी यांनी इंडिया टुडेला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांना अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधी संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना, “अजित पवारांच्या विचारांमध्ये स्पष्टता आहे. आपल्या उत्तराखंडमध्येही एक मोठे नेते आहेत. कितीही वेळा पराभव झाला, तरी ते हार मानत नाहीत. तसेच, अजित पवार आहेत. त्यांना कितीही वेळा उपमुख्यमंत्री होण्यास सांगा, ते कायम तयार असतात” असे कोश्यारी यांनी म्हणले.

शरद पवारांचे कौतुक

यानंतर कोश्यारी यांनी शरद पवारांचे खास कौतुक केले. “शरद पवार देशातील ज्येष्ठ नेते आहेत. आजही सर्वजण शरद पवारांचा आदर करतात. व्यक्तिश: मी त्यांचा खूप आदर करतो. शरद पवारांना दोन विद्यापीठांची पदवी माझ्या हातून देण्याची संधी मिळाली. शरद पवार माझ्या पेक्षा आठ-दहा महिन्यांनी मोठे आहेत, त्यामुळे त्यांचा आदर करणे स्वाभाविक आहे. ते उत्तम राजकारणी आहेत” असे कोश्यारी यांनी शरद पवारांविषयी म्हणले.

तर पुढे बोलताना, “मला कधीकधी अजित पवारांची दया येते. ते अतिशय हुशार आहेत. अजित पवारांकडे चांगला जनाधार आहे. संघटनेत त्यांची ताकद आहे. त्यामुळे अनेक आमदार आणि खासदार त्यांच्याबरोबर असतात. प्रत्येकांचं एक व्यक्तिमत्व असतं” असं देखील कोश्यारी यांनी अजित पवारांविषयी म्हणले आहे.