सोलापूर प्रतिनिधी | चौकशीच्या भीतीने तसेच काही लोक सरकारी पक्षाची मदत मिळावी या उद्देशाने पक्ष सोडत आहेत. मात्र लोक पक्ष सोडून गेल्याने पक्षाला काहीच फरक पडत नसतो. पक्ष वाढतच राहत असतो असे मत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.
हसन मुश्रिप यांना देखील भाजपने ऑफर दिली होती मात्र मुश्रीफांनी निष्टेला महत्व दिले तसेच अनेक लोक चौकशीचा ससेमिरा मागे लागू नये म्हणून देखील भाजपात जात आहेत. त्याच प्रमाणे काही लोक सरकारी पक्षाची मदत मिळावी यासाठी देखील भाजपमध्ये जात आहेत असे अजित पवार म्हणाले आहेत. शरद पवार यांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार हे विधान केल्याने देखील अनेक लोकांनी पक्ष सोडला असे म्हणायला देखील अजित पवार विसरले नाहीत.
मुलाखतीला बार्शी आणि माढ्याचे आमदार गैरहजर होते त्याबद्दल देखील अजित पवार यांना विचारना करण्यात आली. त्यावर अजित पवार म्हणाले, दिलीप सोपल हे बाहेर गावी गेले असल्याने ते येऊ शकले नाहीत त्यांनी आधीच या संदर्भात कल्पना दिली होती. तसेच ते राष्ट्रवादी कडूनच आगामी निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्याच प्रमाणे बबन शिंदे हे मुलाखतीला का आले नाहीत याबद्दल आपण त्यांना फोन करून विचारणार आहे असे अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
रुपाली चाकणकर यांची राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड
चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा ; भाजपमध्ये करणार प्रवेश