हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडेच राज्यपालांची तक्रार केली आहे. पुणे येथील विविध प्रकल्पांच्या उदघाटनाला मोदी आले असता अजित दादांनी आपल्या भाषणातून राज्यपालांवर निशाणा साधत मोदींकडे तक्रार केली आहे.
अजित पवार म्हणाले, अलिकडे अनेक गोष्टी घडत आहेत. मला पंतप्रधान मोदींच्या लक्षात एक गोष्ट आणायची आहे. अलीकडच्या काळात महत्त्वाच्या पदावर बसलेल्या काही सन्माननीय व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्य होत आहेत. ती वक्तव्य महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला पटणारी नाहीत. असे म्हणत अजित पवारांनी राज्यपालांवर निशाणा साधला.
छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांनी संकल्पनेतील हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. महात्मा जोतिबा फुले आणि क्रांती जोती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा पाय रचला. सत्यशोधक विचाराचा प्रसार केला. या महामानवांच्या विचारांचा वारसा आपल्याला पुढे न्यायचाय. कुणाही बद्दल माझ्यामनात आकस नाही. हेही नम्रपणे नमूक करतो असे अजित पवार म्हणाले