हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून आक्रमक पावित्रा घेतला. शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई व चंद्रकांत पाटील बेळगावात जाणार होते. मात्र, त्यांना बंदी घालण्यात आली. जिल्ह्याधिकाऱ्यांनी बंदीचा आदेश दिला. जिल्हाधिकारीच जर बोम्मईचे ऐकत नसेल तर काय करायचे हि दडपशाही आहे. बेळगावात मराठी भाषिकांवर अन्याय करण्यात येत आहे. खपवून घेणार नाही. दिल्लीत जेव्हा मंत्री शहांसोबत बैठक झाली त्यामध्ये नेमकी काय चर्चा केली. महाराष्ट्राबाबत काय भूमिका मांडली? हे जाहीर करा, अशी मागणी अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदेकडे यावेळी केली.
अजित पवार यांनी कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्नावरून दिल्लीत शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सरकारची भूमिका काय हे स्पष्ट करावी, अशी मागणी केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेनीही त्याला चोख प्रत्युत्तर दिले. केंद्रीयमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत काय चर्चा करण्यात आली? असा प्रश्न विचारला जातो. आम्ही महाराष्टाच्या बाजूने कर्नाटकच्या मुद्यांवर ठोस भूमिका मांडली आहे. त्याच्याशी पूर्ण विषयावर चरचा केली आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी पहिल्यादांच कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावर चर्चा केली आहे.
आमच्या महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या गाड्या अडवल्या जात आहेत त्या अडवू नये. सीमावादाचे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. त्यामुळे या प्रश्नी कोणतीही भूमिका घेऊ नये, अशी मागणी केली. त्यानंतर मंत्री शहा यांनी या गोष्टीचे विरोधकांनी अभिनंदन करायला पाहिजे होते, असे म्हंटले.
मात्र, विरोधकांकडून राजकारण केले जात आहे. राजकारण करायला अनेक गोष्टी आहेतत्या नंतर करू. आम्ही जेव्हा कर्नाटक मुख्यमंत्री बोम्मई यांनी ट्विट केले असल्याचे म्हंटले तेव्हा त्यांनीही मी ट्विट न केल्याचे म्हंटले. ट्विटमागे होणं होत? याचीही मागिती ते घेत असून सीमावादाच्या मागे कोण कोण आहे याचीही माहिती सभागृहासमोर आणू, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हंटले.