फडणवीस मुख्यमंत्री न झाल्याने गिरीश महाजन अजुन रडतायत; अजितदादांची जोरदार फटकेबाजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आज पहिल्यांदाच विधानसभा अध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली. यामध्ये भाजपचे राहुल नार्वेकर विजयी झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी त्यांच्या अभिनंदनाच्या भाषणात चौफेर टोलेबाजी करत भाजपला चिमटे काढले. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद न मिळाल्याने गिरीश महाजन तर रडायलाच लागले अस त्यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला.

भाजपचे 106 आमदार आहेत, तरीही त्यांनी स्वतःला विचारावं की हे जे काही घडले त्यातून आपल समाधान झाले आहे का? असा खोचक सवाल अजित पवारांनी केला. युतीत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार असं संपुर्ण महाराष्ट्राला वाटत होतं. परंतु ऐनवेळी दिल्लीतुन चक्रे फिरली आणि एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली. हे कळल्यावर सर्वच स्तबद्ध झाले. भाजपचे लोक तर रडू लागले. गिरीश महाजन तर अजूनही रडत आहेत असं म्हणत अजित पवारांनी सभागृहात हशा पिकवला.

Vidhansabha Adhiveshan Live | शिंदे-फडणवीस सरकारची आज पहिली अग्निपरीक्षा

यावेळी त्यांनी नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. तुम्हाला मुख्यमंत्रीपद हवं होतं तर माझ्या कानात सांगायच होत ना?? ठाकरेंना सांगून तुम्हाला बनवले असते. तिकडे का गेलात? असा सवाल अजित पवारांनी एकनाथ शिंदेंना केला.

दरम्यान, राहुल नार्वेकर कुठल्याही पक्षात गेले तरी ते नेतृत्वाच्या अधिक जवळ जातात. शिवसेनेत असताना ते आदित्य ठाकरेंच्या जवळचे होते. आमच्याकडे आल्यावर ते माझ्या जवळचे झाले आणि भाजपमध्ये गेल्यावर ते देवेंद्र फडणवीसांच्या जवळच झाले. त्यांची ही एक कला आहे. आज त्यांना विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेनीही त्यांना जवळचं करावं, नाहीतर काय खरं नाही असा मिश्किल टोला अजित पवार यांनी लगावला .

Leave a Comment