नवी दिल्ली । आज 14 मे रोजी अक्षय तृतीया (Akshaya Tritiya 2021) आहे. या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. तथापि, मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही देश कोरोनाव्हायरस (Coronavirus Pandemic) ग्रस्त आहे. दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश, बिहारसह अनेक राज्ये सध्या कडक लॉकडाउनमध्ये (Lockdown in India) आहेत. कोरोनामुळे सर्व दागिन्यांची दुकाने बंद आहेत, तथापि, अक्षय तृतीयेला आपण घरबसल्या सोन्याची खरेदी सुरू करू शकता. आपण घरबसल्या 24 कॅरेट शुद्ध सोने देखील खरेदी करू शकता. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने अनेक ज्वेलर्स ऑफरही देत आहेत. आता घरबसल्या आपण सोनं कसे खरेदी करू शकतो आणि कुठे खरेदी केल्यास तुम्हाला सूट मिळेल हे जाणून घेउयात.
आज काय खरेदी करायचे ते जाणून घ्या
जर तुम्हाला या दिवशी सोन्याचे नाणे, बार किंवा दागिने खरेदी करायचे असतील तर डिजिटल मार्ग (Digital Gold) उपलब्ध आहे. इतकेच नाही तर अक्षय तृतीयेच्या दिवशी इतर काही कंपन्या अशा ऑफर घेऊन आल्या आहेत ज्यामध्ये आधी करा आणि लॉकडाऊन संपल्यानंतर त्याची डिलिव्हरी घ्या. आपण MMTC-PAMP डिजिटल गोल्डची फिजिकल डिलिव्हरी देखील घेऊ शकता. हे फिजिकल Coins, Bar मध्ये रूपांतरित केले जाऊ शकते. हे ‘ब्रिक्स’ वॉल्ट’मध्ये स्टोअर केले जाऊ शकते. हा व्यवहार पूर्णपणे डिजिटल आहे. MMTC-PAMP गोल्ड रिफायनिंग आणि मिंटिंग कंपन्या आहेत.
येथे 1 रुपयात खरेदी करा सोने
जर आपण GooglePay, Paytm, PhonePe वापरत असाल किंवा HDFC बँक सिक्युरिटीज मोतीलाल ओसवालचे ग्राहक असाल तर आपण फक्त 1 रुपयात 999.9 शुद्ध प्रमाणित सोने खरेदी करू शकता. वास्तविक, या प्लॅटफॉर्मबरोबर MMTC-PAMP चा करार आहे. जेव्हा आपण Paytm, PhonePe किंवा Stock holding corp कडून कुठल्याही कंपनीकडून सोनं खरेदी करता तेव्हा ते सोनं या MMTC-PAMP च्या सेफ्टी व्हॉल्टमध्ये ठेवलं जातं. शुद्धतेचा प्रश्न असेल तर MMTC-PAMP चे सोने 99.9% शुद्ध आहे, म्हणजे 24 कॅरेट शुद्ध सोने सापडेल.
SBI कार्डसह सोने खरेदीवर कॅशबॅक
सोन्याच्या दागिन्यांची किरकोळ साखळी चालवणारी कंपनी मलबार गोल्डने अक्षय तृतीयासाठी एक खास ऑफर घेतली आहे. Malabar Gold & Diamonds चे Chairman एम पी अहमद Ahammed MP म्हणतात की,” त्यांचे ग्राहक अक्षय्य तृतीया या दिवसाच्या दराने ऑनलाइन खरेदी करू शकतील आणि सोनं बुक करू शकतील. पेमेंट द्या आणि लॉकडाउन संपल्यावर त्याची डिलिव्हरी घ्या. अक्षय तृतीयेसाठी SBI कार्डसह Malabar Goldनेही करार केला आहे. या कार्डद्वारे खरेदी करणार्यांना अतिरिक्त 5 टक्के कॅश परत दिली जाईल.
या कंपन्या देत आहेत खरेदीवर सूट
कल्याण ज्वेलर्स 15 हजार रुपयांहून अधिक किंमतीच्या दागिन्यांच्या ऑनलाईन ऑर्डरवर 5 टक्के सवलत देत आहे. त्याचबरोबर टाटा ग्रुपचा तनिष्क ब्रँड गोल्ड (Tanishq Gold) आणि डायमंड (Diamond) ज्वेलरीच्या मेकिंग चार्जवर 25 टक्क्यांपर्यंत सूट देत आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण कंपनीच्या वेबसाइट www.tanishq.co.in वर भेट देऊ शकता.
Senco gold देत आहे मेकिंग चार्जवर 100% सूट
Senco gold & Diamonds चे सीईओ सुवणकर सेन म्हणतात की,” या वर्षी अक्षय्य तृतीया आणि ईदचा योगायोग आहे. म्हणून, कंपनी या निमित्ताने खरेदीसाठी विशेष प्रोत्साहन देत आहे. त्याअंतर्गत प्रत्येक ग्रॅम सोन्याच्या खरेदीच्याअॅडव्हान्स बुकिंगवर 200 रुपये सूट देण्यात येत आहे. यासह डायमंड ज्वेलरीवरील मेकिंग चार्जवर 100 टक्के सूट दिली जात आहे. ग्राहक कंपनीच्या वेबसाईट sencogoldanddiamonds.com च्या माध्यमातून सोन्याचे Coins, Bar आणि दागिन्यांची खरेदी देखील करू शकतात.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा