आलिया भटला धक्का! तब्बल ७५ % प्रेक्षकांचा चित्रपट पाहण्यास नकार 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । अभिनेता सुशांतसिंग याच्या मृत्यूनंतर मोठ्या प्रमाणात वादाला तोंड फुटले आहे. घराणेशाही, एकाधिकारशाही या विरोधात बोलले जात आहे. अनेकांनी सुशांतसिंग च्या संदर्भात चुकीची वागणूक दिलेल्या कलाकारांचे व्हिडीओ व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे. आलिया भट आणि करण जोहर यांचा कॉफी विथ करण या शोमधील एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होतो आहे. सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूला घराणेशाही जबाबदार मानली जात आहे आणि त्यामध्ये करण जोहर आणि आलिया भट यांना मोठ्या प्रमाणात ट्रॉल केले जात आहे. असेच एक सर्वेक्षण कमाल खान याने केले आहे. त्यामध्ये आता आलियाचा चित्रपट पाहण्यास ७५% प्रेक्षकांनी नकार दिला आहे.

अनेक बॉलिवूड कलाकारांनी सुशांतच्या आत्महत्येसाठी बॉलिवूडमधील घराणेशाहीला जबाबदार धरलं आहे. यामध्ये सर्वाधिक टीका होतेय ती अभिनेत्री आलिया भट्टवर. दरम्यान अभिनेता कमाल आर. खान याने देखील तिच्यावर निशाणा साधला आहे. देशातील ७५ टक्के लोकांना यापुढे तिचे चित्रपट पाहायचे नाहीत, असा दावा त्याने केला आहे. कमाल खान उर्फ केआरके याने काही दिवसांपूर्वी एक पोल केला होता. “यापुढे आलिया भट्टचे चित्रपट तुम्ही पाहाल का?” असा प्रश्न त्याने विचारला होता. आश्चर्याची बाब म्हणजे ७५ टक्के लोकांनी यावर ‘नाही’ असं उत्तर दिलं. या पोलच्या आधारावर केआरकेने भारतातील केवळ १० टक्के लोक आलियाचे चित्रपट पाहतील असा दावा केला आहे.

https://twitter.com/kamaalrkhan/status/1274161074577854476

सध्या आलिया भट्टवर सोशल मीडियाव्दारे प्रचंड टीका होत आहे. या टीकेमुळे तिची सोशल मीडियावरील लोकप्रियता कमालीची कमी झाली आहे. तिचे तब्बल चार लाख ४४ हजार फॉलोअर्स कमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर कमाल खानचे हे ट्विट सध्या सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. दरम्यान शाहरुख खान आणि शाहिद कपूर यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे.