31 मार्चला रविवार असूनही बँका सुरु राहणार; RBI चा मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वसामान्यांसाठी बँकेशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. येत्या ३१ मार्च रविवार असूनही देशातील सर्व बँकांचे कामकाज सुरु राहणार आहे. रिजर्व बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank Of india) याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. त्यामुळे बँक ग्राहकांसाठी दिलासादायक गोष्ट म्हणावी लागेल. ३१ मार्च हा २०२३- २४ च्या चालू आर्थिक वर्षातील शेवटचा दिवस असल्याचे आरबीआयने हा निर्णय घेतला आहे.

आरबीआयने म्हटले आहे की 31 मार्च रोजी आर्थिक वर्षाचा अखेरचा दिवस (March End) असल्याचे देशभरातील सर्व बँका खुल्या राहतील. सर्व बँकांना पाठवलेल्या सूचनांमध्ये असे म्हटले आहे की, कोणतेही आर्थिक वर्ष संपेपर्यंत होणारे व्यवहार त्याच वर्षी नोंदवणे आवश्यक असते त्यामुळे सर्व बँकांना 31 मार्च रोजी रविवार असूनही त्यांचे कामकाज सुरु ठेवण्यात सांगितलं आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवारीही सर्व बँका सुरू राहणार आहेत. याशिवाय NEFT आणि RTGS व्यवहारही मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र, या काळात फक्त शासकीय कामे होतील असं आरबीआयने स्पष्ट केलं आहे.

आयकर विभागाने सुद्धा रद्द केल्या सुट्ट्या –

दरम्यान, यापूर्वी आयकर विभागाने सुद्धा वीकेंडच्या लाँग सुट्ट्या रद्द केल्या आहेत. म्हणजेच शुक्रवार २९ मार्च ते ३१ मार्चपर्यंत विभागाची सर्व कार्यालये सुरू राहणार आहेत. यासंदर्भात आयकर विभागाने परिपत्रकही जारी केले आहे. 29 मार्च 2024 रोजी गुड फ्रायडे आहे. 30 मार्चला शनिवार आणि 31 मार्चला रविवार आहे. या तिन्ही दिवशी तस पाहिले तर सुट्टी असते. परंतु, 31 मार्च 2024 हा चालू आर्थिक वर्ष 2023-24 चा शेवटचा दिवस असल्यामुळे आयकर विभागाने या सर्व सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.