हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | उत्तर महाराष्ट्रातल्या धुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रचंड मोठया प्रमाणावर शिरकाव झाला आहे. अनेक गावात लोकांमध्ये कोरोनाची प्रचंड भीती निर्माण झाली आहे. अशातच जिल्ह्यात संचार बंदीचे आदेश काढले असल्याची बातमी प्रसारित झाली. ही संचारबंदी म्हणजे थेट वाहतूक व्यवस्था सुद्धा बंद केल्याचा आदेश पास झाला असण्याची चुकीची माहिती लोकांपर्यंत पोचवली गेल्यामुळे त्यामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.
पण नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत धुळे जिल्ह्यात नागरी व ग्रामीण क्षेत्रात अत्यावश्यक सेवेत सर्व मालवाहतूक सेवा सुरू राहील, अशा आशयाचे आदेश काढले असून लोकांना त्याबाबत आश्र्वस्त केले आहे.
या आदेशात असे म्हटले आहे की, धुळे जिल्ह्यात ५ एप्रिल २०२१ रोजीच्या रात्री ८ ते ३० एप्रिल २०२१ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी व नाईट कर्फ्यू फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये लागू केले आहे.
पण या निर्बंधांमध्ये काही अत्यावश्यक सेवांना सूट देण्यासंदर्भात राज्य शासनाच्या सुधारीत आदेशानुसार निर्णय झाला आहे. त्यात धुळे जिल्ह्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रात अत्यावश्यक सेवांमध्ये पुढील बाबींना सूट देण्यात आलेल्या पुढील बाबींचा समावेश करण्यात आला आहे. पेट्रेालपंप आणि पेट्रेालियम संबंधित उत्पादने, सर्व मालवाहतूक सेवा, डेटा सेंटर, क्लाऊड सर्विस प्रोवाईडर, आयटी सेवा ज्यात महत्वपूर्ण पायाभूत सेवा व सुविधा देणाऱ्या आस्थापना. शासकीय व खासगी सुरक्षा देणाऱ्या सेवा, फळ विक्रेते यांचा समावेश आहे.
तर खासगी संस्थांना फक्त सुटीच्या दिवशी कार्यालय सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत खुले ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group