अमेरिकेलाही मोदींची भुरळ!! 21 तोफांच्या सलामीने व्हाईट हाऊस स्वागत करणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे पंतप्रधान नरेंद्र हे संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत. जगातील कोणत्याही देशात गेले तरी मोदी आपली छाप पाडतातच हे आपण यापूर्वी सुद्धा पाहिले आहे. मोदींची लोकप्रियता जागतिक स्तरावर दिवसेंदिवस वाढतच चालली असून जगातील अनेक देशांना त्यांची भुरळ पडत आहे. परंतु आता तर जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेवर सुद्धा मोदींनी छाप पाडली आहे. 21 जून ते 24 जून या दरम्यान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असून त्यावेळी त्यांचे 21 तोफांच्या सलामीने स्वागत करण्यात येणार आहे.

यूएस नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलचे समन्वयक जॉन किर्बी यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली आहे. अमेरिका आणि भारत यांच्यात क्वाडमध्ये उत्कृष्ट सहकार्याच्या भावनेवर आधारित “महत्त्वाची संरक्षण भागीदारी” होत आहे. अमेरिका आणि भारत यांच्यातील संरक्षण भागीदारी ही लपून राहिलेली नाही. भारत-पॅसिफिक राजकारण लक्षात घेऊन अमेरिकाही भारतासोबत सहकार्य वाढवत आहे. मी व्यक्तिशः नरेंद्र मोदी यांची आतुरतेने वाट बघत आहे. तसेच अमेरिकेत स्थायिक असलेले भारतीय सुद्धा मोदींची वाट पाहत आहेत असे त्यांनी म्हंटल.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि फर्स्ट लेडी जिल बिडेन यांच्या निमंत्रणावरून नरेंद्र मोदी 21 जून ते 24 जून या कालावधीत अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. 22 जून रोजी व्हाईट हाऊसच्या दक्षिण लॉनवर 7000 हून अधिक भारतीय अमेरिकन उपस्थित राहणार आहेत. त्यावेळीअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि फर्स्ट लेडी २१ तोफांच्या सलामीने मोदींचे स्वागत करतील. आपल्या अमेरिका दौऱ्यात मोदी युनायटेड स्टेट्स काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करतील. या संबोधनाचे निमंत्रण अमेरिकेचे प्रतिनिधी सभागृह आणि सिनेट या दोन्ही सभागृहांनी मोदींना दिले आहे. अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला दोनदा संबोधित करणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरतील.