कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर EPFO ने जुलैमध्ये वेगाने अपडेट केले KYC details

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिटायरमेंट फंड EPFO ने कोविड-19 साथीच्या काळातही जुलै महिन्यात KYC अपडेशन करण्याचे काम वेगाने केले. जुलै 2020 मध्ये, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) 2.39 लाख आधार क्रमांक, 4.28 लाख मोबाइल नंबर आणि 5.26 लाख बँक खात्यांची UAN ग्राहकांच्या खात्यात यशस्वीरित्या अपडेट केली. कामगार व रोजगार मंत्रालयाने ही माहिती दिली.

कामगार आणि रोजगार मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “देशभरातील कोरोना संकटाच्या मध्ये सामाजिक अंतर ठेवणे ही एक महत्त्वाची बाब बनली आहे. ईपीएफओनेही या नियमांचे पालन करून आपले काम पूर्ण केले आहे. ईपीएफओने सध्याच्या या पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवरही प्रमुख सामाजिक सुरक्षा संस्था म्हणून डिजिटल मोडद्वारे व्यत्यय न आणता आपल्या ग्राहकांची सेवा केली आहे.

मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की, ‘ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची सुविधा डिजिटल स्वरूपात वेगाने वाढवण्याची संस्थेची इच्छा आहे. हेच कारण आहे की ईपीएफओ आता KYC डेटा अपडेट सेवा ऑनलाइन मोडद्वारे सहज उपलब्ध करुन देत आहे.

KYC अपडेटचा काय फायदा आहे?
KYC अपडेट करणे ही एक वन-टाइम प्रोसेस आहे ज्यायोगे युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN – Universal Account Number) शी संबंधित ग्राहकांची ओळख वेरिफाय केली जाते. एकदा KYC व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यावर, ग्राहक ऑनलाइन मोडद्वारे ईपीएफओ सेवा मिळविण्यास पात्र ठरतील.

KYC अपडेट करण्यासाठी कर्मचार्‍यांचे टास्क
वास्तविक, ग्राहक आणि कर्मचार्‍यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने, ईपीएफओने गेल्या काही महिन्यांत KYC अपडेट करण्याचे काम तातडीने पूर्ण केले आहे. ईपीएफओने KYC अपडेट करण्यासाठी मोठ्या संख्येने कर्मचारी दिले आहेत. यामध्ये कर्मचारी वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून KYC डिटेल्स मध्ये सुद्धा सुधारणा होत आहेत.

ग्राहकांना सवलत
हे काम वेळेत पूर्ण करण्याचे लक्ष्य होते, जे साध्यही केले गेले आहे. KYC अपडेट मुळे, ग्राहकांना ईपीएफओच्या आवश्यक सेवा त्यांच्या घरातून ऑनलाइन घेण्याची सुविधा मिळत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment