राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली तशी उद्या देशातही होऊ शकते; काँग्रेस नेत्याचे महत्वाचे विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या अडीत वर्षापासून महाविकास आघाडी राज्यात सत्तेत आहे. तरीही महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याबाबत भाजप नेत्यांकडून बोलत आहेत. अशात काँग्रेसच्या एका नेत्याने आता महाविकास आघाडी सरकार राज्यात नव्हे तर देशात होऊ शकते, असे महत्वाचे विधान केले आहे. “राज्यात जशी युती झाली आणि महाविकास आघाडी स्थापन झाली, असेच चित्र देशात दिसण्याची शक्यता आहे. तसेच राहुल गांधी देशातल्या महाविकास आघाडीचे नेतृत्व करू शकतात, असे काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी म्हंटले आहे.

काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यात ज्या प्रमाणे महाविकास आघाडी झाली आहे. त्याचप्रमाणे आज ना उद्या देशातही महविकास आघाडी होऊ शकते. आणि ती जर झाल्यास त्या आघाडीचे नेतृत्व हे राहुल गांधी करतील. त्याचप्रमाणे प्रथम आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवायच्या आहेत, काँग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यानी त्या तयारीला लागावे, असे देशमुख यांनी म्हंटले.

गेल्या काही दिवसांपूर्वीच राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. शिवसेना नेते तथा मंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकताच उत्तर प्रदेशचा दौरा केला. यावेळी त्या ठिकाणी त्यांनी शिवसेना देशातही दिल्लीत जाऊन पोहचेल असे म्हंटले होते. दिल्लीतही आपण सत्ता स्थापन करू, असे ठाकरे यांनी विधान केले होते. त्यांच्या नंतर आता काँग्रेस नेते तथा मंत्री अमित देशमुख यांनी काँग्रेसबाबत आणि राहुल गांधीबाबत मोठे विधान केले आहे.