माजी मुख्यमंत्र्यांना पीए म्हणून ठेवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे मनापासून आभार : अमोल मिटकरी

Amol Mitkari Ekanath Shinde Devendra Fadnavis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. “मुख्यमंत्री शिंदे साहेबांचे मी मनापासून आभार मानतोय, कारण त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांना ‘पीए’ म्हणून ठेवलं,”असा टोला मिटकरींनी फडणवीसांना लगावला आहे.

आ. अमोल मिटकरी यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “महाविकास आघाडी सरकार कायद्याने धरून नसल्याचे भाजप नेते त्यावेळी म्हणत होते. आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापर्यंत यांनीच बेकायदेशीर सरकार स्थापन केले. दोन मंत्र्याच्या मंत्रिमंडळात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् त्यांचे ‘ओएचडी’ म्हणून देवेंद्र फडणवीस काम बघत आहेत.

राज्यात शिंदे-फडणवीसांचे आलेले सरकार सुप्रीम कोर्टाचा निर्णयापर्यंत टिकणार की नाही हे माहित नाही. मात्र, राज्याला अजूनही कृषी मंत्री नाही. तरीही शिंदे साहेबांचे मी मनापासून आभार मानतोय, त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांना ‘पीए’ म्हणून ठेवलं आहे. ठाकरे सरकारच्या काळात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे स्वतः माईक उपमुख्यमंत्री अजित पवार यांना द्यायचे. आताचे उपमुख्यमंत्री हे माईक खेचायला लागले आहेत. पुढे काय काय खेचतील सांगता येत नाही’ असा टोला मिटकरींनी यावेळी लगावला.