हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यातील देहू येथील शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळा पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणे झाली मात्र तिथे उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मात्र भाषणाची संधीच न दिल्याने नव्या वादाला तोंड फुटले. याचवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत इतके भान प्रधानमंत्री व विरोधी पक्ष नेत्यांना असायला हवे होते. धार्मिक ठिकाणी जर राजकारण करत असाल तर वारकरी सांप्रदाय व महाराष्ट्रातील जनता हे कधीच खपवुन घेणार नाही अस अमोल मिटकरी यांनी म्हंटल.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत इतके भान प्रधानमंत्री व विरोधी पक्ष नेत्यांना असायला हवे होते. धार्मिक ठिकाणी जर राजकारण करत असाल तर वारकरी सांप्रदाय व महाराष्ट्रातील जनता हे कधीच खपवुन घेणार नाही.
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 14, 2022
तुकोबारायांचा “भले तरी देऊ कासेची लंगोटी l नाठाळाचे काठी हाणु माथा ll “हा अभंग स्वतःवर उलटण्याची वेळ येऊ नये याची काळजी श्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या अध्यात्माच्या नावाखाली धर्मीक द्वेष पसरवणाऱ्या आध्यात्मिक आघाड्यातील तथाकथित आचार्यांनी घ्यावी असा टोला त्यांनी लगावला.
तुकोबारायांचा "भले तरी देऊ कासेची लंगोटी l नाठाळाचे काठी हाणु माथा ll "हा अभंग स्वतःवर उलटण्याची वेळ येऊ नये याची काळजी श्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या अध्यात्माच्या नावाखाली धर्मीक द्वेष पसरवणाऱ्या आध्यात्मिक आघाड्यातील तथाकथित आचार्यांनी घ्यावी.
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 14, 2022
अजितदादा हे महाराष्ट्र राज्याचे उमुख्यमंत्री व पुणे जिल्हा पालकमंत्री आहेत, प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांनी जर शासकीय प्रोटोकॉल पाळला नसेल व काही कारण नसताना देवेंद्र फडणवीस यांना बोलते करून स्वपक्षाचा प्रचार केला असेल हा संविधानिक पदाचा अपमान आहे मोदीजी चूक दुरुस्त करा असे अमोल मिटकरी म्हणाले.