हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारवर व ठाकरे सरकारवर वारंवार टीका केली जात आहे. त्यानंतर आता भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आघाडी सरकार पडण्याबाबत व युतीबाबत विधान केले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कुमकुवत असून, ते केव्हा पडेल हे काही सांगता येत नाही. जर हे सरकार पडले तर भाजपा चांगला पर्याय देईल, असे मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
पुणे येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट झाली. याला राजकीय भुकंपाचे संकेत मानायचे का? असेल प्रश्न विचारता त्या म्हणाल्या की, ते अगोदरपासून भेटत आले आहेत. अचानक भेटले नाहीत. राज्यातील महाविकास आघाडी सरकार खूप कुमकुवत आहे. हे सरकार केव्हा पडेल, असे प्रत्येकाला वाटते. जर हे सरकार पडले, तर भाजपा एक चांगला पर्याय देईल.
यावेळी अमृता फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या नांदेड दौऱ्याबाबतही मत व्यक्त केले. राज्यपाल यांच्या दौऱ्याला जे विरोध करत आहेत, त्यांचा राजकीय अंतर्गत मुद्दा आहे,” अमृता असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले. यापूर्वीही अमृता फडणवीस यांनी मुंबईवरून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती.