48 तासांत ट्विट डिलीट करा, अन्यथा…; अमृता फडणवीस यांची मलिकांना कायदेशीर नोटीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील आरोप प्रत्यारोपाच्या फैली आता थेट नोटीसीवर आले आहेत. त्याचाच भाग म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नवाब मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. मानहानीकारक आणि दिशाभूल करणारे ट्विट ४८ तासांत डिलीट करा आणि सार्वजनिकपणे माफी मागा. अन्यथा मानहानीच्या खटल्याला सामोर जा. अशा स्वरूपाची नोटीस अमृता फडणवीस यांनी नवाब मलिक यांना पाठवली आहे.

देवेंद्र फडणवीस हे राज्यातील ड्रग्ज उद्योगाचे मास्टर माइंड असल्याचा धक्कादायक आरोपही नवाब मलिक यांनी केला होता. मात्र पत्रकार परिषदेआधी मलिक यांनी ट्विटवरुन अमृता फडणवीस यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीचा फोटो पोस्ट केला होता. याच फोटोबद्दल खुलासा करताना फोटोमधील व्यक्ती जयदीप राणा असून अमृता फडणवीस यांनी गायलेल्या मुंबईमधील नद्यांच्या संवर्धनासंदर्भातील गाण्याचा तो फायनान्स हेड होता असा दावा मलिक यांनी केला. तसेच या गाण्याचा कथित ड्रग्ज पेडलर जयदीप राणाशी काय संबंध आहे याबद्दलही नवाब मलिक यांनी माहिती दिली होती.

यामुळे अमृता फडणवीस यांनी नवाब मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.४८  तासात मानहानीकारक, दिशाभूल करणारे ट्विट डिलिट करा आणि सार्वजनिकपणे माफी मागा अन्यथा मानहानीच्या खटल्याला सामोरे जा असा इशार अमृता फडणवीस यांनी मलिकांना दिला आहे.