हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या चित्र विचित्र फॅशनमुळे अभिनेत्री उर्फी जावेद नेहमीच चर्चेत आली आहे. सध्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याकडून उर्फीविरोधात आक्रमक पावित्रा घेतला जात आहे. मात्र, याउलट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उर्फीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “उर्फी एक स्त्री म्हणून जे काही करतेय, त्यात मला काहीही वावगं वाटत नाही,” असे फडणवीस यांनी म्हंटल आहे.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, कपडे घालण्याबाबत प्रत्येकाचे विचार असतात. चित्रा वाघ यांचे जे विचार आहेत ते त्यांनी प्रकट केले आणि त्या दृष्टीने त्या ॲक्शन घेत आहेत. माझा विचार आहे कि उर्फीने थोडं संस्कृतीच्या हिशोबाने राहिली तर चांगलं आहे. ती पण एक स्त्री आहे. ती सुद्धा स्वतःसाठी काही तरी करत आहे. त्याच मला काही वावगं वाटत नाही.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया स्टार उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात वाद सुरु आहे. या दोघींमधील शाब्दिक युद्ध काही केल्या थांबायचे नावचं घेत नाही. काळ तर दोघींनी एकमेकींवर चांगला निशाणा साधला. मला पूर्ण कपडे घातल्यामुळे ॲलर्जी होते, असे उर्फीने म्हटले. आणि या कारणावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आम्ही इलाज करतो, असे म्हटले. यानंतर उर्फीने ‘चित्रा मेरी सासू” हे ट्विट केले. तिचे हे ट्विट सोशल मीडियावर तुफान चर्चेत राहिले. त्यानंतर आता अमृता फडणवीस यांनी उर्फीच्या बाजूने प्रतिक्रिया दिली असल्याने याला चित्रा वाघ यांच्याकडून नेमकं काय उत्तर दिलं जाणार? हे पहावं लागणार आहे.