‘अमूल’चं दूध महागलं; ‘हेच का अच्छे दिन?’ म्हणत काँग्रेसचा भाजपवर निशाणा

Amul Milk Congress BJP (1)
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वाढत्या महागाईमुळे सामान्य लोक त्रासले असतानाच पुन्हा एकदा दुधाच्या दरात वाढ झाली आहे. अमूल दुधात लिटरमागे 3 रुपयांनी वाढ झाली असून अमूलने आजपासून आपली दरवाढ जाहीर केली आहे. यावरून काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे.

काँग्रेसने ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. वर्षभरात अमूलचं दूध 8 रुपये प्रति लिटरने महागलं आहे. असे म्हणत काँग्रेसने काही वर्षण उपस्थित केले आहेत. दुधाच्या दरात लिटरमागे ३ रुपयांनी वाढ झाल्याने तुमच्या खिशावर काय परिणाम होईल? जर तुमचे कुटुंब दररोज 2 लिटर दूध घेत असेल, तर आता तुम्हाला दररोज 6 रुपये अधिक मोजावे लागतील. एका महिन्यात 180 रुपये अधिक, एका वर्षात 2 हजार 160 अधिक त्यामुळे अमृतकाल आहे की पुनर्प्राप्ती काल? हा प्रश्नही स्वतःला विचारा, असे ट्विट काँग्रेसने केले आहे.

दरम्यान, अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दोनच दिवसात देशातील सर्वात मोठी दूध वितरक कंपनी अमूल यांनी आपल्या दूधाच्या किमतीत प्रतिलीटर 3 रुपयांनी वाढ केली आहे. अमूलची अर्धालीटरची दूधाची पिशवी विकत घेण्यासाठी 27 रुपये मोजावे लागणार आहेत. तर 1 लीटर दूधासाठी 54 रुपये द्यावे लागणार आहेत.

अमूल उत्पादन लिटर दरवाढ रुपयांमध्ये

1) अमूल ताझा 500 मिली – 27
2) अमूल ताझा 1 लीटर – 54
3) अमूल ताझा 2 लीटर – 108
4) अमूल ताझा 6 लिटर – 524
5) अमूल ताझा 180 मिली – 10
6) अमूल गोल्ड 500 मिली – 33
7) अमूल गोल्ड 1 लीटर – 66
8) अमूल गोल्ड 6 लीटर – 396
9) अमूल गायीचे दूध 500 मिली – 28
10) अमूल गायीचे दूध 1 लीटर – 56
11) अमूल A2 म्हशीचे दूध 500 मिली – 35
12) अमूल A2 म्हशीचे दूध 1 लीटर – 70
13) अमूल A2 म्हशीचे दूध 6 लिटर – 420