सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल, डाळी अशा सर्वच गोष्टींचे दर दररोज वाढत आहेत. सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. इंधन दरवाढीसह महागाई विरोधात व केंद्र सरकारच्या विरोधात युवा सेनेच्यावतीने आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर थाळी वाजवून आंदोलन करण्यात आले.
यावेळी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले, उपजिल्हा प्रमुख सचिन मोहिते, शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख नवनाथ पाटील, विध्यार्थी सेना जिल्हा प्रमुख संभाजी पाटील, माथाडी कामगार सेना जिल्हा प्रमुख प्रशांत शिंदे, महेश शिर्के, मनोज पवार, माऊली पिसाळ, निवास महाडिक, तुषार घोरपडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, युवा सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एकत्रित येत केंद्र सरकारच्या विरोधात व महागाई विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन दरवाढ व महागाई बाबत घेतलेल्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला.