Wednesday, March 29, 2023

हर्षवर्धन पाटील यांनी मुलगी अंकितासोबत घेतली उदयनराजेंची भेट

- Advertisement -

सातारा : हॅलो महाराष्ट्र्र – सर्वोच्च न्यायालायने काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षण रद्द केले होते. त्यामुळे राज्यात सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले होते. मराठा आरक्षण रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. याच मराठा आरक्षणवरून खासदार संभाजीराजे देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

त्यामध्येच आता माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे तरुणांमध्ये जी चिंता निर्माण झाली तसेच तरुणांची जी मराठा आरक्षणा संदर्भात मागणी व विचार आहेत हे सर्व सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज व भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या समोर मांडले. त्यांच्या या मागणीवर महाराजांनी युवकांमध्ये असलेल्या भावनांना सकारात्मक प्रतिसाद दिला व बहुमोल असे मार्गदर्शनदेखील केले.

https://www.instagram.com/p/CPlAz_sgjHw/?utm_medium=copy_link

मराठा आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाजातील युवकाच्या जीवनात अंधार निर्माण झाला आहे. तसेच शैक्षणिक व नोकरी मध्ये असलेले आरक्षण रद्द झाल्यामुळे याचा मोठा फटका युवकांना बसला आहे. या कारणामुळे युवकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला. तसेच या मराठा आरक्षणासंदर्भात जर लवकर निर्णय झाला नाहीतर युवक रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाहीत असे अंकिता पाटील म्हणल्या आहेत.