हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुपरमार्केटमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णयराज्य सरकारने नुकताच घेतला. या निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. तसेच 14 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रात म्हंटले आहे की,
राज्य सरकारने वाईन विक्रीसंबंधी जो धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्यानुसार सुपरमार्केट आणि किराणा दुकानांमधून वाईन विक्री सुरू करणे महाराष्ट्रासाठी अतिशय दुर्दैवी आहे. केवळ राज्याचा वाढणारा महसूल आणि वाईन उत्पादक आणि विक्रेते यांचे हित पाहून हा निर्णय घेतल्याचे दिसून येते. पण या निर्णयामुळे लहान मुले तरुण व्यसनाधीन होऊ शकतो.
किराणा दुकानात वाईनविक्रीच्या राज्यसरकारच्या निर्णयाविरोधात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे 14 फेब्रुवारी पासून करणार आमरण उपोषण , मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून अण्णांनी आंदोलन करणार असल्याचं स्पष्ट केलंय !#AnnaHazare #Ralegansiddhi #ahmednagar @bbcnewsmarathi @shyampathade pic.twitter.com/D7zIizQaS5
— Shahid Shaikh (@ShahidReports) February 9, 2022
युवा शक्ती ही आमची राष्ट्रशक्ती आहे. ती बरबाद करू पाहणाऱ्या निर्णयाला विरोध करण्याशिवाय पर्याय नाही. वाईन ही दारू नाही असा दुर्दैवी युक्तिवाद सरकारकडून करण्यात येत आहे हेही आश्वचर्यकारक आहे. गेल्या काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातून वाईन विक्रीच्या निर्णयाला कडाडून विरोध होत आहे. राज्यातील 36 जिल्ह्यात भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे संघटन आहे.
Social activist Anna Hazare announces an indefinite hunger strike from 14 February against the Maharashtra government over its decision to sell wine supermarkets and walk-in stores. pic.twitter.com/Zv79JD8iYm
— ANI (@ANI) February 9, 2022
त्या सर्व कार्यकर्त्यांनी आपणाकडे निवेदन पाठवून जाहीर विरोध दर्शविलेला आहे. या सर्वांची या निर्णयाविरोधात राज्यभर आंदोलन करण्याची तयारी आहे. तरीही सरकारला जाग येत नसेल तर आंदोलनाशिवाय पर्याय दिसत नाही, असे अण्णा हजारे यांनी पत्रातून म्हंटले आहे.