पद्मसिंह पाटलांनी माझी सुपारी दिली होती ; अण्णांची सीबीआय कोर्टात साक्ष

0
52
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | पद्मसिंह पाटील यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली होती. या संदर्भात मी तत्कालीन पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना पत्र लिहून सुध्दा त्यांनी कसलीच दखल घेतली नाही. कारण पद्मसिंह पाटील यांचे नातेवाईक शरद पवार हे त्यावेळी केंद्रात मंत्री होती अशी खळबळ जनक साक्ष अण्णा हजारे यांनी सीबीआय न्यायालयात मुंबई येथे दिली आहे. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्ये प्रकरणी त्यांची साक्ष नोंदवून घेण्यात आली आहे. या खटल्यात अण्णा हजारे यांची साक्ष देताना या खटल्यातील मुख्य आरोपी माजी खासदार डॉ.पद्मसिंह पाटील यांच्यासह या खटल्याचे सहआरोपी देखील न्यायालयात हजर होते.

तेरणा साखर कारखान्यात झालेल्या भष्टाचाराचे पुरावे सरकाराच्या ताब्यात दिले होते. मात्र सरकारने काहीच कारवाही केली नाही. त्यानंतर मी मला मिळलेले पद्मश्री आणि वनमित्र पुरस्कार शासनाला परत केले , तरी देखील कसलीच कारवाही केली गेली नाही. त्यानंतर मी अमरण उपोषण धरले तेव्हा पी. बी. सावंत यांच्या अध्यक्षतेत समिती नेमण्यात आली असे अण्णा हजारे यांनी म्हणले आहे.

दरम्यान बचाव पक्षाच्या वकिलांनी अण्णा हजारे यांची चांगलीच उलट तपासणी घेतली. पवनराजे हत्या प्रकरणाबाबत आपणास काय माहिती आहे काय असे विचारले असता अण्णा हजारे यांनी आपणास जी माहिती मिळाली ती सर्व वृत्तपत्र आणि माध्यमातून मिळाली असे अण्णा म्हणले. तसेच आपला या प्रकरणाशी कसलाही संबंध नाही असे अण्णा हजारे म्हणाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here