नवी दिल्ली । आयफोन निर्माता कंपनी अॅपल लवकरच आपली पहिली इलेक्ट्रिक कार लवकरच बाजारात आणण्याच्या विचारात आहे. अॅपलचे सीईओ टिम कुक म्हणाले की,”अॅपलची कार खूप खास असेल. जी एलन मस्कची कार टेस्लाला जबरदस्त टक्कर देईल.” त्याचबरोबर, मीडिया रिपोर्ट्सही असा दावा करत आहेत की, अॅपल 2024 मध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक कार बाजारात आणणार आहे. त्यापूर्वी, अॅपलची कार टेस्लापेक्षा चांगली कशी असेल हे जाणून घ्या.
अॅपलच्या कारमध्ये हे वैशिष्ट्य असेल
अॅपलच्या पहिल्या इलेक्ट्रिक कारची बॅटरी मजबूत असेल. जी नेक्स्ट जनरेशन बॅटरी असेल. अॅपल मोनो सेलवर काम करत असल्याचे तज्ञांचे मत आहे. जे त्यांच्या पहिल्या इलेक्ट्रिक कारमध्ये वापरेल. यावेळी, टेस्ला आपल्या कारमध्ये लिथियम-आयन बॅटरी वापरते. जी फास्ट चार्ज तर होतेच तसेच त्यांची रेंज देखील जास्त आहे. अशा परिस्थितीत नेक्स्ट जनरेशन मोनो सेल खूप शक्तिशाली असेल.
अॅपलच्या कारमध्ये हे फीचर्स असतील
अॅपल यासाठी Lidar Sensors, जे आपल्याला रस्त्याचे 3 डी व्ह्यू देईल. 2017 मध्ये अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक अॅपलच्या ऑटोनमस ड्रायव्हिंग सॉफ्टवेअरबद्दल बोलले. हे असे तंत्रज्ञान आहे ज्यास मदर ऑफ ऑल AI प्रोजेक्ट्स असे म्हटले जात आहे.
याक्षणी बाजारात टेस्लाची ‘ही’ कार आहे
याक्षणी टेस्लाकडे 4 इलेक्ट्रिक कार आहेत. ज्यामध्ये मॉडेल एस, मॉडेल 3, मॉडेल एक्स 7 आणि मॉडेल वाय कारचा समावेश आहे. या सर्व कारची रेंज वेगवेगळी आहे. त्याच वेळी टेस्ला लवकरच भारतात मॉडेल 3 लॉन्च करण्याची योजना आखत आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा