हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Iphone SE 4 : Apple कंपनी iPhone च्या बाबतीत नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. आताही कंपनीचा नवीन स्मार्टफोन येण्यासाठी खूप वेळ बाकी असूनही त्यावर आतापसूनच चर्चा होऊ लागली आहे. सध्या अशी बातमी आली आहे की, पुढच्या वर्षी Apple कडून कमी किंमतीचा iPhone SE 4 लाँच करण्याची तयारी केली जात आहे. Mashable या वेबसाइटवरील माहितीनुसार, या नवीन iPhone SE ची किंमत कंपनीच्या प्रीमियम iPhone सीरिजच्या किंमतींपेक्षा खूपच कमी असेल.”
तसेच कंपनीच्या या नवीन iPhone ला Google च्या Pixel 7a ला कडून जोरदार टक्कर मिळण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते आहे. गुगल पिक्सेल सीरीजला अँड्रॉइड फोन सेगमेंटमधील सर्वात प्रिमियम रेंज असे म्हणता येईल. मात्र जर Apple कडून कमी किंमतीचा आयफोन लाँच केला गेला तर यामुळे गुगलचे धाबे दणाणू शकते.
एका मीडिया रिपोर्टनुसार, iPhone SE 4 मध्ये एक महत्त्वाचा बदल पाहायला मिळण्याची जास्त शक्यता आहे. iPhone SE 4 मध्ये 4.7-इंच स्क्रीन दिली जाऊ शकते, असे म्हटले जात आहे. याशिवाय, यामध्ये नॉच डिझाइन आणि आधीपेक्षा बारीक बेझल्सही मिळतील.
हे फिचर काढून टाकण्याची तयारी
Mashable च्या रिपोर्टनुसार, Apple कडून iPhone SE 4 च्या फेस आयडीवर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याने त्याचा टच आयडी काढून टाकला जाईल. याशिवाय, एक अशीही माहिती समोर आली आहे की, iPhone SE 4 मध्ये A16 Bionic CPU दिला जाऊ शकेल, जो 2019 मध्ये iPhone 14 Pro मॉडेलमध्येही देण्यात आला होता. यामुळे फोनची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होईल.
हे लक्षात घ्या कि, सध्याच्या iPhone SE 3 मध्ये 5G सपोर्ट देखील उपलब्ध आहे. त्यामुळे या नवीन iPhone SE 4 मध्येही 5G सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे. मात्र या फोनच्या डिझाईन बाबत बोलायचे झाल्यास Apple कडून या मॉडेलसाठी iPhone XR चा लूक फॉलो केला जाऊ शकतो.
हे पण वाचा :
LIC ची जबरदस्त पॉलिसी! 4 वर्षांसाठी पैसे जमा करून मिळवा 1 कोटीचा फायदा
New Business Idea : घरबसल्या ‘हा’ छोटासा व्यवसाय मिळवून देईल मोठी कमाई
Recharge Plans : IPL सामने पाहण्यासाठी ‘हे’ आहेत सर्वात बेस्ट रिचार्ज प्लॅन
Earn Money : आता घरबसल्या कंपन्यांसाठी ‘हे’ काम करून दरमहा मिळवा लाखो रुपये
Small Saving Scheme : आता ‘या’ लहान बचत योजनांमध्ये पॅन-आधार शिवाय करता येणार नाही गुंतवणूक