LPG वर सबसिडी मिळत आहे की नाही ते अशा प्रकारे तपासा

Cashback Offers
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । LPG गॅस सिलेंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मात्र, LPG सबसिडीद्वारे तुम्हांला मोठा दिलासा मिळू शकतो. सबसिडीचे पैसे थेट ग्राहकांच्या खात्यात पाठवले जातात. यासाठी आधी तुम्ही सबसिडी मिळवण्यास पात्र आहात की नाही हे पाहावे लागेल.

तुम्ही LPG सबसिडी मिळवण्यास पात्र असाल तरच तुम्हाला सबसिडी मिळत आहे की नाही ते तपासा. जर मिळत असेल तर तुमच्या बँक खात्यात पैसे येत आहेत की नाही हे पहावे लागेल. जर पैसे येत नसतील तर तुम्ही ताबडतोब तुमच्या बँक खात्याशी आधार लिंक करून घ्या. आधार लिंक केल्यानंतर, पैसे थेट तुमच्या खात्यात येऊ लागतील.

सबसिडी न मिळण्याचे प्रमुख कारण
सबसिडी न मिळण्याचे प्रमुख कारण म्हणजे LPG आयडी खाते क्रमांकाशी लिंक न करणे. यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या डिस्ट्रिब्यूटरशी संपर्क साधून त्याला तुमच्या समस्येची जाणीव करून द्यावी. त्याच वेळी, तुम्ही 18002333555 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून तुमची तक्रार नोंदवू शकता. LPG ची सबसिडी वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी असते, ज्यांचे वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये किंवा त्याहून अधिक आहे, त्यांना सबसिडी दिली जात नाही.. 10 लाख रुपयांचे हे वार्षिक उत्पन्न पती-पत्नी दोघांची मिळकत आहे.

घरबसल्या अशा प्रकारे तपासा
>> सर्वप्रथम तुम्हाला http://www.mylpg.in या वेबसाइटवर जावे लागेल.
>> यानंतर येथे तुम्हाला उजवीकडे तीन कंपन्यांच्या गॅस सिलेंडरचा फोटो दिसेल.
>> येथे तुम्ही तुमच्या सर्व्हिस प्रोव्हायडरसोबत असलेल्या गॅस सिलेंडरच्या फोटोवर क्लिक करा.
>> यानंतर तुम्हाला एक नवीन विंडो ओपन होईल, त्यामध्ये तुमच्या गॅस सर्व्हिस प्रोव्हायडरची माहिती असेल.
>> यानंतर उजवीकडे वरच्या बाजूला Sign In आणि New User चा पर्याय असेल, तो निवडा.
>> यानंतर तुमचा आयडी राहिल्यास येथे साइन इन करा, अन्यथा तुम्हाला नवीन युझर निवडावा लागेल.
>> यानंतर आणखी एक नवीन विंडो उघडेल, ज्यामध्ये उजव्या बाजूला View Cylinder Booking History हा पर्याय असेल, तो निवडा.
>> तुम्हाला सबसिडी मिळतेय की नाही ते कळेल. तुम्हाला सबसिडी मिळत नसेल तर तुम्ही 18002333555 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करू शकता.