ट्विटरवर अभिनेत्री युविका चौधरीच्या अटकेची मागणी जोरावर; हाथ जोडून मागितली माफी

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पद्यावरील सध्या अनेक सेलिब्रिटी त्यांच्या या ना त्या वक्तव्यामुळे लोकांच्या ट्रोलिंगचा आणि रागाचा शिकार होत आहे. सोशल मीडियावर बिग बॉस फेम अभिनेत्री युविका चौधरी हिला अश्याच संदर्भात अटक करण्याची मागणी होत आहे. सध्या ट्विटरवर #ArrestYuvikaChoudhary हा हॅशटॅग ट्रेंडिंग वर आहे.एका व्हिडिओ दरम्यान युविकाने विशिष्ट जतीबाबत अपमानजनक शब्दांचा उल्लेख केल्यामुळे तिच्या अटकेची मागणी जोरावर आहे. पण युविकाने प्रसंगावधान राखत सोशल मीडियावर तात्काळ माफीनामा प्रकट केला आहे. 

इंस्टाग्राम सोशल मीडियावर युविकाने एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये युविका पतीसोबत म्हणजेच प्रिन्स नेरूला सोबत दिसत आहे . युविकाने एका विशिष्ट जातीवर काही अपमानजनक शब्दांचा उल्लेख करत म्हणाली, जेव्हा मी ब्लॉग बनवते तेव्हा अश्या प्रकारे (विवादीत शब्द) येऊन उभी राहते. मला इतका वेळ नाही मिळत की स्वत:ला चांगल्या प्रकारे दाखवू शकेल आणि हा (प्रिन्स ) मला तयार होण्याकरितासुद्धा वेळ देत नाही. युविकाच्या या वादग्रस्त व्हिडिओ नंतर युविकाच्या अटकेची मागणी सोशल मीडियावर जोर धरू लागली. 

मात्र प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेता युविकाने व्हिडिओ डिलीट करत माफी मागितली आहे. ” मला या शब्दाचा अर्थ माहित नाही. पण, हे बोलताना कोणालाही दुखवण्याचा माझा हेतू नव्हता. मी सर्वांची मनापासून माफी मागते. मला माहीती आहे तुम्ही मला समजून घ्याल. सर्वांना प्रेम”अशा प्रकारची सोशल मीडियावर माफीनामा म्हणून तिने पोस्ट सादर केली आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री मुनमुन दत्ता सुद्धा अशाच प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य केल्याने चांगलीच अडचणीत आली होती. यानंतर तिच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.