नवी दिल्ली | देशात १९८४ मध्ये झलेल्या शीखविरोधी दंगलप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस या प्रकरणातील दुसऱ्या एका आरोपीला मुख्मंत्रीपदाची शपथ देत आहे. ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याची टीका केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसवर केली आहे.
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांच्यासह मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असलेले कमलनाथ यांच्यावर १९८४ मध्ये दंगल घडवून आणल्याचा आरोप आहे. त्यातील सज्जन कुमार यांना दोषी ठरवत दो जन्मठेपेची शिक्षा सुनविण्यात आली आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने शीख दंगलप्रकरणी आज दिलेल्या निकालावर प्रतिक्रिया देतांना अरुण जेटली यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. आमच्यापैकी अनेक जण या हत्याकांडाचे साक्षीदार होते. सर्वात भयंकर असे हे हत्याकांड होते. त्यावेळी काँग्रेस सरकारला दंगलीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश आले होते. मात्र आता शीख दंगलप्रकरणी शिक्षा सुनावण्यास सुरुवात झाली असून त्यामुळे काँग्रेस आणि गांधी परिवारावर संकट ओढवले असल्याचेही जेटली म्हणाले.
इतर महत्वाचे –
माजी आर्मी ऑफिसर होणार राजस्थानचा मुख्यमंत्री?
भाजपाची हार हे तर भारतात लोकशाही मजबुत असल्याचं उदाहरण – सुमित्रा महाजन