आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित NCB चे दोन अधिकारी निलंबित; वानखेडेंच्या जागी ‘या’ अधिकाऱ्याची नियुक्ती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील तपासाशी संबंधित असलेल्या एनसीबीच्या दोन अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तर प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकारी समीर वानखेडे यांच्या जागी आयआरएस अधिकारी अमित घावटे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

आर्यन खान तपास व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या प्रकरणानंतर एलसीबी अधिकारी चांगलेच चर्चेत आले आहेत. या दोन्ही प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनसीबीच्या मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासह दोन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये वानखेडे यांच्या जागी अमित घावटे यांची नियुक्ती करण्यात आली असून आर्यन खान प्रकरणाच्या तपासलं दोन अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांमध्ये विश्व विजय सिंह आणि आशिष रंजन प्रसाद याचा समावेश आहे. विश्व विजय सिंह यांची बदली गुवाहाटी येथे करण्यात आली होती. आता त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तर दुसरे अधिकारी आशिष रंजन प्रसाद यांचेही निलंबन करण्यात आले. हे दोन्ही आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अधिकारी होते. मात्र, त्यांचे निलंबन इतर प्रकरणात करण्यात आले आहे.

प्रकरण काय आहे?

2 ऑक्टोबर 2021 रोजी मुंबईहून गोव्याला कोर्डिलिया आलिशान क्रूझ निघाले होते. त्यावेळी या क्रूझवर एनसीबीकडून ड्रग्स जप्तीची कारवाई करण्यात आली. त्यात अभिनेता शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खानसह त्याचा बालमित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यासह अन्य 20 जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक आणि या तपासाचे तत्कालीन प्रमुख समीर वानखेडेंविरोधात आरोपांची मोहीम सुरू केली होती.

Leave a Comment