कोण राहुल गांधी?? मी ओळखत नाही..; ओवेसींचा हल्लाबोल

0
49
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑल इंडिया मजलिस-ए- इत्तेहादुल- मुस्लिमीन (एआयएमआयएम) नेते असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी कोण आहेत?? मी त्यांना ओळखत नाही असे म्हणत ओवेसींनी राहुल गांधींना फटकारले आहे. तसेच आगामी दोन ते तीन वर्षांत काँग्रेस फुटेल, असा मोठा दावा ओवेसी यांनी यावेळी बोलताना केला.

ओवेसी म्हणाले, आम्हाला प्रत्येक पक्षाची बी-टीम म्हणून ओळखले जाते. जर तुम्ही राहुल गांधींना इथे बोलावले तर ते भाजपासारखीच भाषा बोलतील आणि तशीच भाषा अखिलेश यादवही बोलतील,” ते म्हणाले.

ममता बॅनर्जी प्रमुख असलेला तृणमूल काँग्रेस पक्ष आता पश्चिम बंगालच्या बाहेर पडत त्रिपुरा, गोव्यासह अन्य राज्यांमध्ये विस्तार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. आता ममता बॅनर्जी यांना बी-टीम बनवण्यात आले आहे, मी यावर आक्षेप घेतला आहे. बी-टीम असणे हा माझा टॅग आहे. पण आता काँग्रेस त्यांना भाजपाची बी-टीम म्हणत आहे असे ओवेसींनी म्हंटल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here