हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारवर सध्या भाजप नेत्यांकडून अनेक मुद्यांवरून निशाणा साधला जात आहे. आज माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी व शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर भाजप आमदार आशिष शेलार यांनी हिंदू सणांवरून ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. “हिंदू नववर्ष असलेल्या गुडीपाडवा दिवशी शोभा यात्रा निघणार आहेत. मात्र, मुंबईत पोलिसांनी 144 कलम लागू केले आहे. हिंदूंचे सण म्हंटले कि सरकारच्या हाताला लकवा का मारतो. आणि रामभक्तांचा कार्यक्रम म्हंटल्यावर शिवसेनेची बोटचेपीची भूमिका का होते? असा सवाल शेलार यांनी केला आहे.
आशिष शेलार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, हिंदू नववर्ष असलेल्या गुडीपाडवा दिवशी शोभा यात्रा निघणार आहेत. तसेच एप्रिल महिन्यात राम नवमी आहे. या रामनवमीच्या मिरवणुका सुद्धा राज्यभर निघतात. मात्र, या मिरवणुकाच्या परवानगीबाबत राज्य सरकारची भूमिका सुस्पष्ट नाही. मी याबादला मुद्दा उपस्थित केला.
आता माझ्याकडे आलेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांनी १० मार्च ते एप्रिलच्या आठ तारखेपर्यंत जमाव बंदीचे आदेश लागू केले आहेत. त्याला कारण दिले आहेत कि दहशतवादी हल्ला होण्याची भीती आहे. सणाच्या कालावधीत त्यांनी 144 कलमांचा वापर केला आहे. आम्ही या सरकारकडे मागणी करत आहोत कि रामनवमी आणि गुडी पाडवा या दोन्ही सणांना संपूर्णपणे कायदेशीर प्रक्रिया करून परवानगी देण्यात यावी. यांच्यामध्ये खोडा टाकू नये, असेही आशिष शेलार यांनी म्हंटले आहे.