ही तर तिघाडीतील तीन पक्षांची ‘महिषासुरी’ चाल; महाराष्ट्र बंद वरून शेलारांचा घणाघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी येथे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या पुत्राने गाडीने शेतकऱ्यांना चिरडून मारल्याच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आज, ११ ऑक्टोबर रोजी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे. यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी सरकार वर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र बंद ही तर तिघाडीतील तीन पक्षांची ‘महिषासुरी’ चाल आहे अशी घणाघाती टीका आशिष शेलार यांनी केली.

बंद आणि बंद..बंद करा हे बंद..! ज्यांनी मुंबईला बंद करुन आपले दुकान चालवतात त्या तथाकथित ‘बंदसम्राटांचा’ पुन्हा आज इतिहास आठवा. मुंबईतील गिरणी बंदला छुपा पाठींबा देऊन कामगारांना उद्ध्वस्त केलं, युनियनच्या नावाने कारखाने बंद करुन कष्टकरी श्रमिकांना देशोधडीला लावलं,” असं म्हणत शेलार यांनी निशाणा साधला.

“एवढेच कशाला आता, सत्तेत आल्यावर मेट्रो कारशेडचे काम बंद करुन मुंबईकरांना वेठीस धरलंय. कोस्टल रोडला विरोध, नवी मुंबई, चिपी विमानतळाला विरोध, समृद्धी महामार्गला विरोध, मेट्रोचेही हे विरोधकच, हे तर विकासातील गतीरोधक! बंद आणि विरोध यांचा ‘धंदा’ गोळा होतो त्यावरच ‘चंदा’!,” असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला.

“आई जगदंबेच्या नवरात्रीत महाराष्ट्र बंद. ही तर तिघाडीतील तीन पक्षांची ‘महिषासुरी’ चाल. आई  दुर्गामाते जनतेला दे ‘बळ’! उधळून टाकील जनता या महिषासुरांचा हा ‘खेळ’!,” अशा शब्दांत आशिष शेलार यांनी जोरदार टीका केली.

Leave a Comment