चीनकडून ट्विटरला धमकी वजा समझ म्हणाले,”आम्हांला बदनाम करणारी खाती बंद करा नाहीतर…”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ट्विटरकडून चीनच्या बाजूने बनावट बातम्या पसरवणारे हजारो अकाउंट्स बंद केल्याने चिनी ड्रॅगन पुरता चिडला आहे. याप्रकरणी नुकतीच चीनची प्रतिक्रियाही समोर आलेली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हू चूनिंग यांनी ट्विटरवरुन हजारो ‘चीनी चाहत्यांची खाती’ हटविल्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. चुनिंग म्हणाल्या की, ‘ट्विटरने चीनची बदनामी करणारी अकाउंट्सही बंद केली पाहिजेत कारण काही लोक सातत्याने चीनला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत.’

प्रवक्त्या पुढे म्हणाल्या की, कोरोना विषाणूविरूद्धच्या लढाईत चीनचे प्रयत्न सर्वज्ञात आहेत मात्र,तरीही जगातील काही शक्तींनी सातत्याने चीनला बदनाम करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. त्यांनी सांगितले की, “परंतु एकीकडे ट्विटर कंपनीचा असा विश्वास आहे की चीनची प्रशंसा करणारे हे अकाउंट्स चुकीची माहिती देत आहेत त्यामुळे त्यांना बंद करावे लागेल. तर दुसरीकडे, चीनला बदनाम करणारे अकाउंट्स मात्र त्यांनी सुरुच ठेवलेले आहेत.हे अन्यायकारक आहे आणि दुहेरी निकषांचा परिणाम आहे. ‘

फेक न्यूज आणि पेड न्यूजला सर्वाधिक बळी चीन पडला असल्याचे त्यांनी पुन्हा सांगितले. चीनने आंतरराष्ट्रीय समुदायाला एकत्र येण्याचे आणि बनावट माहितीचा प्रतिकार करण्याचे आवाहन केले. चिनी राजकीय अधिकाऱ्यांच्या ट्विटर वापराच्या प्रश्नावर चिनी प्रवक्त्यानी सांगितले की,’ डिजिटल तंत्रज्ञानाच्या सध्याच्या युगात परदेशात बसलेल्या चिनी राजकीय अधिकाऱ्यांना ट्विटर वापरण्याची सवय आहे.’

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment