हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या ३ आठवड्यांपासून कोरियन प्रायद्वीपात शांतता होती आणि लोकांचे सगळे लक्ष फक्त किम जोंग उनकडेच होते.उत्तर कोरियाचा हुकूमशहा असलेल्या किम जोंग याच्या आरोग्याबद्दल जगभरातील लोक अनेक अनुमान लावत होते.मात्र,शनिवारी सुमारे २० दिवसांनंतर तो प्रथमच सार्वजनिक ठिकाणी दिसून आला आणि त्याच्या दुसर्याच दिवशी म्हणजे रविवारी उत्तर कोरियाच्या सैन्याने साऊथ कोरियाच्यासीमेवर गोळीबार केला.मिळालेल्या वृत्तानुसार दक्षिण कोरियाच्या सैनिकांनीही उत्तर कोरियाच्या सैनिकांच्या या कारवाईवर पलटवार केला.
दोन्ही देशांकडून तणावपूर्ण गोळीबार
दक्षिण कोरियाचे जॉइंट चीफ ऑफ स्टाफ यांनी म्हटले आहे की त्यांच्या आणि उत्तर कोरियाच्या सैनिकांमध्ये सीमेवर तणावपूर्ण गोळीबार झाला आहे. त्यांनी सोलमध्ये सांगितले की रविवारी स्थानिक वेळेनुसार रात्री ०७:४१ वाजता उत्तर कोरियाच्या सैन्याने दक्षिण कोरियाच्या सीमा रक्षणाच्या चौकीवर गोळीबार केला. लष्कराने दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, उत्तर देताना चेतावणी देण्यासाठी दक्षिण कोरियाने २ फेऱ्या उडावल्या. निवेदनात असेही म्हटले आहे की या गोळीबारात दक्षिण कोरियामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.मात्र,उत्तर कोरियाच्या सैन्याने गोळीबार का केला हे अजूनपर्यंत स्पष्ट झालेले नाहीये.
किम जोंग उनला २० दिवसांनंतर पाहिले गेले
उत्तर कोरियाचा शासक किम जोंग उन याला शनिवारी,२० दिवसांनंतर सार्वजनिकरित्या पहिले गेले आणि त्याने आपल्या आरोग्याशी संबंधित चाललेल्या सर्व तर्कवितर्कांना आळा घातला. त्याच्या एक दिवसाने रविवारी सीमेवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.किमचे प्रथमच सार्वजनिकरित्या प्योंगयांगजवळील एका खताच्या कारखान्याचे उद्घाटन झाले तिथे दिसून आला.तथापि,त्याची पुढची भेट उत्तर कोरियाच्या ‘अॅम्यूनेशन फॅक्टरी’ येथे झाली त्यानंतर जगाचे लक्ष पुन्हा तिकडे लागून रहिले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.