पाकिस्तानमध्ये कोरोनाचे रुग्ण ४६०१ पर्यंत वाढले आणि मृतांचा आकडा ६६ वर पोचला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूची संख्या झपाट्याने वाढून ४६०१ झाली आहे तर ६६ लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात संसर्गाची २८० नवीन प्रकरणे समोर आली आहेत. शुक्रवारी पहाटे राष्ट्रीय आरोग्य सेवा मंत्रालयाने आपल्या संकेतस्थळावर सांगितले की गेल्या २४ तासांत कोरोना विषाणूमुळे चार रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात म्हटले आहे की कोविड -१९च्या कारणामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ६६ वर पोहचली आहे.७२७ लोक बरे झाले आहेत, तर ४५ जणांची प्रकृती गंभीर आहे.

पंजाब प्रांतात कोविद -१९, चे २,२७०, सिंधमधील ११२८, खैबर-पख्तूनख्वामध्ये ६२०, बलुचिस्तानमध्ये २१९, गिलगित बाल्टिस्तानमध्ये २१५, इस्लामाबादमध्ये १०७ आणि पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमध्ये ३३ रुग्ण आढळले आहेत.अधिकृत आकडेवारीनुसार आतापर्यंत,५४७०६ लोकांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी २४७८ जणांची तपासणी गेल्या २४ तासांत करण्यात आली. कोविड -१९च्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकारने गरजूंना रोख रक्कम देण्यासह विविध पावले उचलली आहेत.

दरम्यान, पाकिस्तानचे अध्यक्ष आरिफ अल्वी यांनी जाहीर केले की शुक्रवारी मर्यादित लोकांच्या उपस्थितीत राष्ट्रपती निवासस्थानी खास प्रार्थना ‘सलात-उ-तौबा’ केली जाईल.पंतप्रधान इम्रान खान शुक्रवारी पेशावर भेट देणार आहेत. तेथे खैबर-पख्तूनख्वा सरकार त्यांना या विषाणूपासून बचाव करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या खबरदारीच्या उपायांची सविस्तर माहिती देईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.