हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने भारताविरोधात उघड भूमिका घेतली आहे. इस्लामचे रक्षण करणे हे आमचं कर्तव्य असून भारताविरोधात हल्ला करण्यासाठी दक्षिण आणि आग्नेय आशियातील मुस्लिमांनी एकत्र यावं असं आवाहन इस्लामिक स्टेटने केलं आहे.
इस्लामिक स्टेटचा प्रवक्ता अबू उमर अल-मुजाहिरने याबाबत म्हंटल की, इस्लामिक स्टेट भारतात इस्लामचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे. अल-मुजाहिर यांनी 32 मिनिटांच्या अरबी भाषेतील भाषणात भारत, पाकिस्तान, बांगलादेश, फिलीपिन्स, मलेशिया आणि सिंगापूरमधील मुस्लिमांना संबोधित करताना म्हंटल, भीतीमुळं मुस्लिमांमधील धर्म रक्षणाची भावना संपलीय. त्यांच्यात आता शत्रूशीही लढण्याची ताकद उरलेली नाही. पण तुम्हाला तुमच्या धर्मासाठी उभे राहून तुमच्या शत्रूंशी लढावे लागेल.
भाषणापूर्वी जारी केलेल्या एका वेगळ्या व्हिडिओमध्ये, इस्लामिक स्टेट जिहादी कुर्दिश मिलिशयांना मारताना दाखवले होते ज्यांना युद्धकैदी म्हणून पकडण्यात आले होते. अल-मुजाहिरचे भाषण हे मुस्लिमांवरील अत्याचारांसाठी भारताला लक्ष्य करणाऱ्या जिहादी विधानांपैकी एक आहे. यामध्ये मारल्या गेलेल्या अल-कायदा प्रमुख अयमान अल-जवाहिरीचा एक व्हिडिओ टेप केलेला एप्रिल संदेश आहे, जो प्रथम द प्रिंटने नोंदवला आहे.