11 मे नंतर नवीन सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग येणार; ‘त्या’ Tweet ने खळबळ

maharshtra politics
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होत असल्याचा निर्णय जाहीर केला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पवारांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामागे नेमकं काय राजकारण आहे याबाबत तर्क- वितर्क लढवले जात आहेत. त्यातच आता कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांच्या ट्विटने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या घडामोडींचा संदर्भ देत 11 मे नंतर नवीन सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग येणार असं त्यांनी म्हंटल आहे.

असीम सरोदे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वरून ट्विट करत म्हंटल आहे. राष्ट्रवादीचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, कार्याध्यक्ष, पदाधिकारी 10 मे च्या आधी नक्की होतील. 11 मे नंतर नवीन सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग येणार हे सुद्धा नक्की…. असीम सरोदे यांच्या या ट्विटनंतर पुन्हा एकदा राजकीय चर्चाना उधाण आलं आहे. राज्यातील सत्तासंघर्षावरील निकाल सर्वोच्च न्यायालय कधीही जाहीर करू शकत. अशा परिस्थितीत जर एकनाथ शिंदेंसोबतचे आमदार अपात्र ठरले तर राष्ट्रवादी काँग्रेस सरकारला तारणार का ? असा प्रश्नही निर्माण झाला आहे.

दरम्यान, शरद पवारांनी अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर संपूर्ण देशातील नेत्यांकडून तसेच राज्यातील राष्ट्रवादीच्या दिग्गज नेतेमंडळींकडून त्यांची मनधरणी सुरु आहे. मात्र पवार अजूनही आपल्या निर्णयावर ठाम आहेत. उद्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडणार असून यावेळीच नवीन अध्यक्षांची निवड होईल अशाही चर्चा सुरु आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण यांकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य लागलं आहे.