मला क्रुझ पार्टीसाठी निमंत्रण होतं, पण मी गेलो नाही- अस्लम शेख

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आर्यन खान ड्रग प्रकरणानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान या पार्टीसाठी आमच्या सरकारचे मंत्री अस्लम शेख यांनाही निमंत्रण दिले गेले. परंतु ते गेले नाहीत. सेलिब्रेटींच्या मुलांना बोलावून त्यांना जाळ्यात अडकवण्याचं प्लॅनिंग होतं. असा गौप्यस्फोट मलिक यांनी केला होता. याबाबत, मंत्री अस्लम शेख यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मला क्रुझ पार्टीसाठी निमंत्रण होतं, पण मी गेलो नाही असे अस्लम शेख यांनी म्हंटल. तसेच आपण काशीफ खान याला ओळखत नाही असेही ते म्हणाले.

अस्लम शेख यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. मी मुंबईचा पालकमंत्री आहे. त्यामुळे अनेक लोक लग्न सोहळे, वाढदिवसाला मला बोलवत असतात. त्याचप्रमाणे मला या पार्टीचंही आमंत्रण होतं. मात्र मी काशिफ खान नावाच्या व्यक्तीला ओळखत नाही. त्याला मी कधीच भेटलो नाही असे ते म्हणाले. तसेच या प्रकरणात षडयंत्र होतं की नाही याचा एजन्सी तपास करत आहे, असं अस्लम शेख म्हणाले.

मी काशिफ खानला व्यक्तीगतरित्या ओळखत नाही, तसेच माझ्याकडे त्याचा संपर्क क्रमांकही नाही. जर कोणाकडे यासंदर्भातील पुरावा असेल, तर तो पुराव सबंधित यंत्रणांकडे देऊ शकता, असे अस्लम शेख यांनी म्हंटल. काशिफ खानकडे माझा नंबर आहे की नाही मला माहीत नाही. माझा मोबाईल पीएकडे असतो. काशिफशी फोनवर संभाष झालं नाही. संभाषण झाल्याचं मला आठवत नाही असं त्यांनी सांगितलं.

You might also like