गुवाहाटी : वृत्तसंस्था – पोलीस अधिकारी असलेल्या एका तरुणीने आपल्याच होणाऱ्या नवऱ्याला अटक केली आहे. हे प्रकरण आसामच्या गुवाहाटीमधील आहे. जुनमोनी राभा (Junmoni Rabha) असं या महिला पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. तिचा होणारा पती राणा पोगाग याने ऑइल इंडिया लिमिटेडचा पीआर अधिकारी म्हणून आपली ओळख खोटी सांगत असे. जुनमोनी (Junmoni Rabha) यांनाही त्याने अशाच प्रकारे मोठा अधिकारी असल्याचं सांगून फसवलं होतं. तसंच, त्याने अनेकांना ओआयएल इंडिया लिमिटेडमध्ये नोकरी देण्याच्या खोट्या बहाण्याने करोडो रुपयांची कथितपणे फसवणूक केल्याचा आरोप त्याचावर आहे.
कशा प्रकारे झाला खुलासा ?
हा सगळा धक्कादायक प्रकार आसाममधील नगांव या जिल्ह्यात घडला आहे. जोनमणी राभा (Junmoni Rabha) ही तरुण पोलीस अधिकारी नगांव ठाण्यात पोस्टींगवर होत्या. यावेळी आपला होणारा नवरा राणा पगग यांनं फसवणूक करुन लग्नाचा कट रचवून आणल्याची शंका पोलीस अधिकारी तरुणीला आली त्यानुसार तिने या प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली. या तपासामध्ये या तरुणाने गंडवून आठ लाख रुपयांची फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळं या तरुणाला फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे.
कशा प्रकारे झाली या दोघांची भेट ?
तरुण महिला पोलीस अधिकारी जोनमणी राभा (Junmoni Rabha) यांची 2021 मध्ये माजुलीमध्ये पोस्टिंग झाली होती. त्या दरम्यान, पगग हा स्वतःला ओएनजीसीचा पीआरओ म्हणजेच जनसंपर्क अधिकारी असल्याचा दावा करत होता. यानंतर या दोघांचा संपर्क वाढला. त्यानंतर पगगने जोनमणी यांना लग्नाची मागणी घातली. जोनमणी या तरुणी पोलीस अधिकारी असलेल्या महिलेनंही लग्नाला होकार दिला. यानंतर 2 ऑक्टोबर 2021 मध्ये दोघांचा साखरपुडा झाला. 2022 मध्ये लग्न करण्याचे यावेळी ठरले होते. नोव्हेंबर 2022 मध्ये लग्न करण्याचा मुहूर्त काढण्यात आला होता. यादरम्यान जोनमणी राभा यांना आपल्या होणाऱ्या नवऱ्यावर संशय आला त्यानुसार त्यांनी तपास सुरु केला असता स्वतःला ओएनजीसीचा पीआरओ सांगणाऱ्या पगगने कंत्राट देण्याच्या नावाखाली 25 लाख रुपयांची फसवणूक केली असल्याचे समोर आले. यानंतर अधिक तपास केला असता पगग ओएनजीसीमध्ये कामाला नसल्याचं उघडकीस आलं. यानंतर संशय पक्का झाला. पगग एक एसयूव्ही वापरत होता आणि बॉडीगार्डही त्याने ठेवलेला. पण हे सगळे भाड्याचे असल्याचे समोर आले. यानंतर जोनमणीनं पगगविरोधात धडक कारवाई करत त्याला अटक केली आहे. पगगवर फसवणूक, खोटी कागदपत्र देणं, लोकांकडून पैसे लाटणं या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे पण वाचा
‘या’ 4 घरगुती उपायांनी मानेचा काळेपणा करा दूर
इथं एक पोरगी मिळेना अन् ‘या’ पठ्ठ्यानं चक्क 3 जणींसोबत केलं एकाच वेळी लग्न
अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सोने खरेदी करताय? जाणून घ्या आजचे दर