एकेकाळी दिवसाला मिळत होती 35 रुपये मजुरी, त्यानंतर भारताला जिंकवून दिला २०११ चा वर्ल्ड कप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |गुजरात मधील इखार या अज्ञात खेड्यातून येऊन कोणी 28 वर्षानंतर २०११ च्या विश्वकरंडक जिंकण्यात भारतासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल असे कुणाला स्वप्नातही वाटणार नाही.पण हे खरं आहे. ही गोष्ट आहे भारतचा जलदगती गोलंदाज मुनाफ पटेल याची. दररोज मजुरी करणारा एक मजूर ते भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज होण्याचा त्याचा हा प्रवास एखाद्या सुंदर स्वप्नातून काही कमी नाही.

एकेकाळी दिवसाला 35 रुपयांत काम करणारे मुनाफ पटेल स्वत: म्हणाले होते की जर त्याने बालपणात बॉल आणि बॅट हातात घेतली नसती तर आज कदाचित ते एका आफ्रिकन कंपनीत नोकरी करत असत कारण त्याच्या गावातील बहुतेक लोक तिथे राहण्यासाठी जात असत.

हळूहळू मुनाफने स्वत: ला क्रिकेटच्या जवळ केले. त्याने खेळायला सुरवात केली. जेव्हा दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू आणि छोट्या शहरांतून क्रिकेटपटूंचा शोध घेण्यात आला तेव्हा त्याचे नशीब उजळले. मुनाफच्या नैसर्गिक वेगाने आकर्षित झालेले किरण मोरे, जे त्यावेळी मुख्य निवडक होते, त्यांनी त्याला एमआरएफ पेस फाउंडेशन मध्ये बोलवलं.

त्यावेळी संस्थेचे संचालक असलेले डेनिस लिली आणि या दौर्‍यावर असलेले स्टीव्ह वॉ या दोघांचे लक्ष वेधण्यात मुनाफ ला यश आले. सचिन तेंडुलकरला ही बातमी समजताच त्यांनी मुनाफला मुंबईत बोलावले. मास्टर-ब्लास्टर त्याचा सर्व खर्च उचलत असे.

मजबूत वेग आणि अचूक टप्प्या मुळे त्याची तुलना महान ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राशी केली गेली आणि 2006 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या मायदेशी दौर्‍यावर त्याने पहिला कसोटी सामना खेळला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment