Ather 450x Gen 3 : Ather ने लॉंच केली दमदार इलेक्ट्रिक स्कुटर; पहा किंमत आणि फीचर्स

Ather 450x Gen 3
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची (Ather 450x Gen 3) चलती आहे. एक से बढकर एक इलेक्ट्रिक वाहनं आता मार्केटमध्ये येतायत.त्याच पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता कंपनी Ather Energy ने आपली नवीन स्कूटर Ather 450X Gen 3 भारतात लॉन्च केली आहे. या इलेकट्रीक स्कुटरची किंमत 1.55 लाख रुपये असून बुधवार पासून विक्री सुरु झाली आहे. Ather ने आपली हि स्कूटर 450X Gen 3 अनेक बदलांसह परिपूर्ण मॉडेल म्हणून लॉन्च केली आहे.

146km मायलेज- (Ather 450x Gen 3)

नवीन Ather 450X Gen 3 पूर्वीपेक्षा 25 टक्के अधिक पॉवरने सुसज्ज आहे . या इलेकट्रीक स्कूटरला इको, राइड, स्पोर्ट आणि वार्प असे चार राइड मोड मिळतात. ather ची ही स्कूटर सिंगल चार्जवर 146km पर्यंत प्रवास करू शकते. Ather 450X Gen 3 ला एक मोठा आणि अधिक शक्तिशाली बॅटरी पॅक मिळतो. त्यामुळे हाय-स्पीड मोडमध्येही, हि स्कुटर रस्ता, तापमान किंवा स्कूटरवरील लोड याची पर्वा न करता संपूर्ण प्रवासात त्याची पॉवर कायम ठेवते. तसेच, 450X Gen 3 ला नवीन स्मार्ट EcoTM मोड मिळतो. त्याद्वारे, रायडर्स ‘इको’ मोडच्या रेंजसह ‘राइड’ मोडमध्ये क्रूजिंग चा आनंद घेऊ शकतात.

Ather 450x Gen 3

दमदार टायर-

या इलेकट्रीक स्कूटरमध्ये (Ather 450x Gen 3)विशेष प्रकारचा टायर वापरण्यात आला आहे ज्याला 20 टक्के ज्यादा ग्रीप आहे. हे टायर सर्व हवामान अनुकूल आहेत. हे टायर स्कूटरला टर्न मारण्यात मोठी भूमिका बजावतात. याशिवाय इमर्जन्सी परिस्थितीत ब्रेकिंग सिस्टीमही खूप चांगली आहे.

Ather 450x Gen 3

वैशिष्ट्ये-

Ather 450X Gen 3 इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये, कंपनीने जास्तीत जास्त अॅप्स स्टोअर करण्यासाठी 16GB मेमरी स्पेससह 7-इंच टचस्क्रीन कन्सोल दिले आहे, Ather ने या 2022 मॉडेलसाठी 2GB RAM सह 450X Android OS प्रणाली देखील अपग्रेड केली आहे. Ather 450X Gen3 मध्ये ऍप्रॉन-माउंटेड LED हेडलाइट, फ्लॅट फूटबोर्ड, फ्लश-फिटेड साइड स्टँड, डिझायनर मिरर, स्टेप-अप सीट्स आणि LED टेललॅम्प देण्यात आले आहेत.

Ather 450x Gen 3

450X Gen 3 ची किंमत-

मुंबई – 149,934 रुपये
पुणे – 146,340 रुपये
दिल्ली – 139,007 रुपये
हैदराबाद – 157,402 रुपये
चेन्नई – 157,507 रुपये

हे पण वाचा : 

TVS Ronin 225 : बुलेटला टक्कर देणार TVS ची Ronin 225; पहा वैशिष्ट्ये आणि किंमत

Bajaj Pulsar N160 : बजाजची Pulsar N160 नुकतीच लॉंच; पहा किंमत आणि फीचर्स

Citroen C3 Launch : दमदार फीचर्ससह Citroen C3ची भारतात धमाकेदार एन्ट्री; पहा काय आहे किंमत

BMW G310 RR : BMWने लाँच केली दमदार बाईक; पहा किंमत आणि फीचर्स

Hyundai Tucson 2022 : ह्युंदाईची नवी Tucson बाजारात लॉन्च; पहा फीचर्स आणि किंमत