हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ATM Transaction : आजकाल ऑनलाईन पेमेंटमुळे रोख रक्कम वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र अनेकदा अचानक काही कामांसाठी रोख रकमेची गरज लागू लागते. अशा वेळी एटीएममधून पैसे काढले जातात. मात्र कधी कधी एटीएममधून पैसे काढताना असे घडते कि, नेटवर्क किंवा इतर कारणांमुळे ट्रान्सझॅक्शन फेल होते आणि खात्यातून पैसे कापले जातात. मात्र आता यासाठी काळजी करण्याची काहीच गरज नाही. कारण या संदर्भात आपल्याला सदर बँकेच्या कस्टमर केअरला फोन करून तक्रार करता येईल. त्यानंतर बँकेकडून 12-15 दिवसांत हे पैसे परत केले जातील.
भरपाईची तरतूद
यामध्ये आता जर बँकेने आपल्या खात्यातून डेबिट केलेली रक्कम दिलेल्या वेळेत परत केली नाही तर नुकसान भरपाईची तरतूद आहे. RBI च्या नियमांनुसार बँकेला 5 दिवसांच्या आत तक्रारी निकालात काढाव्या लागतात. या कालावधीत बँकेने काही न केल्यास त्यानंतर 100 रुपये प्रतिदिन या दराने भरपाई द्यावी लागेल. मात्र यानंतरही काही काम झाले नाही तर https://cms.rbi.org.in वर तक्रार नोंदवता येईल. ATM Transaction
भरपाईची रक्कम निश्चित
इथे हे लक्षात घ्या कि, RBI चे नियम कार्ड टू कार्ड फंड ट्रान्सफर, PoS ट्रान्सझॅक्शन, IMPS ट्रान्सझॅक्शन, UPI ट्रान्सझॅक्शन, कार्डलेस ई-कॉमर्स आणि मोबाइल अॅप ट्रान्सझॅक्शन यासारख्या सर्व अधिकृत पेमेंट सिस्टीमवर देखील लागू होतात. भरपाईची रक्कम निश्चित असताना, अनेक प्रकरणांमध्ये बँकेच्या बाजूने सेटलमेंटचा कालावधी देखील कमी असतो. यामध्ये कार्ड टू कार्ड ट्रान्सफर किंवा IMPS च्या तक्रारी दुसऱ्या दिवसापर्यंत निकालात काढाव्या लागतील. ATM Transaction
लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी
हे लक्षात घ्या की, जेव्हा कधी एटीएममध्ये ट्रान्सझॅक्शन पूर्ण होणार नाही, तेव्हा अशा परिस्थितीत पैसे काढल्याची नोटिफिकेशन लगेचच तपासावी. यासोबतच आपल्या बँकेच्या खात्यातील बॅलन्सची माहितीही घ्यावी. जेणेकरून खात्यातून पैसे कापले गेलेत की नाही हे कळू शकेल. जर पैसे कापले गेले असतील तर पाच दिवस वाट पाहता येईल. मात्र जर यानंतरही कापले गेलेले पैसे परत आले नाहीत तर अशा परिस्थितीत ट्रान्सझॅक्शन फेल झाल्याबाबत बँकेशी संपर्क साधून तक्रार करता येईल. ATM Transaction
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://m.rbi.org.in/scripts/FAQView.aspx?Id=75
हे पण वाचा :
CIBIL Score म्हणजे काय ??? याचा कर्जाच्या पात्रतेवर कसा परिणाम होतो ते समजून घ्या
HDFC कडून होम लोनवरील व्याज दरात वाढ, आता ग्राहकांना द्यावा लागणार जास्त EMI
Train Cancelled : रेल्वेकडून 291 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ, जाणून घ्या आजचा नवीन भाव
Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळवा 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, अशा प्रकारे तपासा पात्रता