नवी दिल्ली । आपण पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक असाल तर आपल्यासाठी ही महत्वाची माहिती आहे. PNB ने आपल्या ग्राहकांना सतर्क केले असून हा अलर्ट ऑनलाईन बँकिंगबाबत आहे. वास्तविक, आजकाल बँकेच्या ग्राहकांना इंटरनेट बँकिंग, बँक एप्लिकेशन किंवा UPI मार्फत व्यवहार करणे अवघड जात आहे. कोरोना आणि लॉकडाऊन दरम्यान बँक आपल्या ग्राहकांना ऑनलाईन / नेट बँकिंगद्वारे अनेक सुविधा पुरवित आहे, जेणेकरुन ग्राहक घरबसल्या आपली कामे पूर्ण करू शकतील.
Dear customer, apologies for the inconvenience caused to you. Can you please elaborate on your query via Direct Message, so that we may help you. Thank you.
— Punjab National Bank (@pnbindia) June 14, 2021
तांत्रिक कारणांमुळे अडचणी
PNB चे ग्राहक काही काळापासून बँकेला ट्विटरवर टॅग करत तक्रार नोंदवत आहेत. ऑनलाइन बँकिंगमध्ये ग्राहकांना अडचणी येत आहेत. बँका देखील ग्राहकांच्या समस्या सातत्याने समजून घेत आहेत आणि त्या समस्या लवकरात लवकर सोडवतील याची हमी देत आहेत. तांत्रिक कारणांमुळे ते कठीण होत असल्याचे PNB ने आपल्या ट्विटमध्ये कबूल केले आहे.
बँक काय म्हणाली ?
बँक म्हणाली-“प्रिय ग्राहक, तुम्हांला होणार्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आमच्या (इंटरनेट बँकिंग, यूपीआय, एपीपी) सेवांमध्ये काही तांत्रिक कारणांमुळे समस्या येत आहेत. तथापि, आमची टीम यावर काम करत असून लवकरच त्याचे निराकरण केले जाईल.”
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा